बिअर हे जगातील सर्वात आवडत्या पेयांपैकी एक आहे. जगातील सर्वात जुन्या पेयांमध्ये पाणी, चहानंतर बिअर तिसऱ्या स्थानावर आहे. एका जुन्या आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी ४३,५२,६५,५०,००,००० बिअरच्या कॅनची विक्री केली जाते. आजच्या जमान्यात, आपला पबमधला पार्टीचा मूड असो की मित्रमंडळींमध्ये जल्लोषाचे वातावरण असो, बिअर ही सर्वत्र असतेच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असे म्हटले जाते की प्राचीन मेसोपोटेमियाच्या सुमेरियन सभ्यतेच्या काळापासून मानव बिअरचे सेवन करत आहे. परंतु बिअरच्या बॉटल्स या नेहमीच हिरव्या किंवा तपकिरी रंगाच्या असतात. या दोन रंगांव्यतिरिक्त तुम्ही इतर कोणत्या रंगात बिअरची बॉटल बघितली आहे का? आजही बहुतेक मद्यपान करणाऱ्यांना बिअरच्या बाटल्या या दोन रंगात का येतात याचे कारण माहीत नाही. आज आपण जाणून घेऊया यामागील वैज्ञानिक कारण.

कांजण्यांवरील लस शोधणाऱ्या Dr. Michiaki Takahashi यांची ९४वी जयंती; Google ने वाहिली खास श्रद्धांजली

हजारो वर्षांपूर्वी प्राचीन इजिप्तमध्ये पहिली बिअर कंपनी सुरु करण्यात आली होती असे मानले जाते. तेव्हा पारदर्शक बाटल्यांमध्ये बिअर पॅक केली जायची. तेव्हा असे आढळून आले की या बाटल्यांमध्ये बिअर पॅक केल्यावर सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे बिअर खराब होत असे. त्यामुळे बिअरला दुर्गंधी येत होती आणि लोक ते पीत नव्हते.

ही समस्या सोडवण्यासाठी बिअर उत्पादकांनी एक योजना आखली. त्याअंतर्गत बिअरसाठी तपकिरी परत चढवलेल्या बाटल्या निवडण्यात आल्या. ही युक्ती कामी आली. या रंगाच्या बाटल्यांमध्ये ठेवलेली बिअर खराब होत नव्हती, कारण सूर्याच्या किरणांचा तपकिरी बाटल्यांवर परिणाम होत नव्हता.

दुसऱ्या महायुद्धानंतर तपकिरी बाटल्यांची कमतरता जाणवू लागली. या रंगाच्या बाटल्या सापडत नव्हत्या. अशातच, बिअर उत्पादकांना असा एक रंग निवडायचा होता ज्यावर सूर्याच्या किरणांचा वाईट प्रभाव पडू शकणार नाही. त्यानंतर तपकिरी रंगाऐवजी हिरवा रंग निवडण्यात आला. तेव्हापासून बिअर हिरव्या बाटल्यांमध्ये येऊ लागली.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why are beer bottles only green and brown scientific reason behind this pvp