बालदिन दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. यंदा १४ नोव्हेंबरला मंगळवारी आला आहे. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे मुलांवर खूप प्रेम होते, मुलेही नेहरूजींना चाचा नेहरू म्हणत असत. चाचा नेहरूंचे मुलांवरील प्रेम पाहून १४ नोव्हेंबर हा त्यांचा जन्म दिवस बालदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतात १४ नोव्हेंबरला बालदिन का साजरा केला जातो?
बालदिन हा १९५६ पासून २० नोव्हेंबर रोजी ‘युनिव्हर्सल चिल्ड्रन्स डे’ म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाच्या अनुषंगाने साजरा करण्यात येत होता पण भारतात ७ मे १९६४ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले, त्याच वर्षी संसदेत १४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा करण्याची एकमताने घोषणा करण्यात आली, तेव्हापासून बालदिन १४ नोव्हेंबर रोजी भारतात साजरा केला जात आहे.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे मुलांवर खूप प्रेम होते. देश स्वतंत्र झाल्यानंतर पंडित नेहरु यांनी मुलांचे आणि तरुणांचे हक्क आणि शिक्षण यासाठी काम केले. चाचा नेहरूंचे मुलांवरचे प्रेम आणि मुलांचे चाचा नेहरु यांच्यावर असलेले प्रेम यामुळे १४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो.

हेही वाचा – मुलांवर लहानपणीच करा ‘असे’ संस्कार, मोठे झाल्यावरही राहील आई-वडीलांचे कष्ट, त्याग आणि प्रेमाची जाणीव

जवाहरलाल नेहरूंचे मुलांच्या शिक्षणात योगदान
जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना त्यांनी मुलांच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी खूप योगदान दिले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यासारख्या देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था स्थापन केल्या होत्या. जवाहरलाल नेहरू नेहमीच मुलांच्या शिक्षणाबाबत जनजागृती करत असे.

बालदिनाचे महत्त्व आणि इतिहास
पंतप्रधान या नात्याने नेहरूंना देशात असे वातावरण निर्माण करायचे होते जिथे मुलांवर आणि त्यांच्या कल्याणाकडे लक्ष दिले जाईल. त्यांनी १९५५ मध्ये चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी इंडियाची स्थापना केली जेणेकरून भारतीय मुलांना त्यांचे प्रतिनिधित्व पाहता येईल. पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर, त्यांची जयंती ही भारतातील बालदिनाची तारीख म्हणून निवडली गेली.

जवाहर लाल नेहरू यांच्या मते, ही मुलं आपल्या भारताचा निर्माण करतील. मुलं हे आपल्या देशाचे भविष्य आहेत म्हणून त्यांचा शिक्षण आणि कल्याणावर भर देणे सर्वांचे कर्तव्य आहे. आपण मुलांची जितकी चांगली काळजी घेऊ तितकी राष्ट्र उभारणी चांगली होईल.”

हेही वाचा Diwali 2023 : दिवाळीमध्ये फराळावर ताव मारताय? आरोग्याकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…

कसा साजरा केला जातो बालदिन

बालदिवसाच्या निमित्ताने देशभरात शाळांमध्ये लहान मुलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम, खेळांचे आयोजन केले जाते. शाळेमध्ये वकृत्व स्पर्धा आयोजित केल्या जाता. अनेक ठिकाणी मुलांना भेटवस्तू आणि खाऊ सुद्धा दिल्या जातात. यासोबतच या दिवशी मुलांना बाल हक्कांबाबत जागरूक केले जाते. मुलांसाठी शिक्षण, आरोग्य, संस्कृती हे फारच महत्वाचे असते कारण हीच मुले आपल्या देशाचे भविष्य घडवणार असतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why childrens day is celelbrated on 14 november history importance and significance snk