कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी किंवा घरातून बाहेर पडण्यापूर्वी दही साखर देण्याची प्रथा आहे. लहानपणापासून तुम्ही पाहिले असेल की, परिक्षेच्या वेळी किंवा मुलाखतीला जाण्यापूर्वी घरची स्त्री व्यक्तीला दही साखर देते.
हिंदू धर्मात या प्रथेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू धर्मानुसार कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी जर खाण्यासाठी दही साखर दिली तर ते शुभ मानले जाते. पण, तुम्हाला माहिती आहे का या प्रथेमागे वैज्ञानिक कारणसुद्धा आहे. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या.
दही साखर खाण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. दही हे अन्न पचवण्यास मदत करते. दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये कॅल्शियम, व्हिटामिन बी २, बी १२, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतात, जे शरीराला ऊर्जा पुरवतात.
साखरेत कार्ब्स असतात, जे रक्तातील साखरेची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मेंदूमध्ये रक्ताभिसरण होऊन स्मरणशक्ती वाढते.
हेही वाचा : वजन कमी करण्यासाठी कार्ब्स आणि फॅट्सचे सेवन कमी करताय? तुमचे आयुष्य होऊ शकते कमी, संशोधनाचा दावा
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर थंड असणे खूप गरजेचे आहे. आयुर्वेदानुसार दही शरीरात असणारी उष्णता कमी करण्यास मदत करते; याशिवाय साखर शरीराला ग्लुकोज पुरवते. जर आपण दही साखर एकत्र खाल्ली तर शरीर थंड राहण्यास मदत करते आणि यामुळे दिवसभर शरीराला ऊर्जा मिळते.
अशात परीक्षा, नोकरीसाठी मुलाखत असेल किंवा काळजी किंवा तणावाची स्थिती असेल तर दही साखर शरीराला ऊर्जा पुरवण्यास आणि एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)