डॉ. हेमंत तोडकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूर्वी चष्मा केवल वयस्क किंवा ज्येष्ठ नागरिकांच्याच डोळ्यांवर पाहायला मिळायचा. परंतु, आता लहान लहान मुलांनादेखील चष्मा लागल्याचं दिसून येतं. सध्याच्या बदलत्या काळात लहान मुले सतत टीव्ही, व्हिडीओ गेम, लॅपटॉप यांचा वापर करताना दिसतात . त्यामुळे डोळ्यांवर ताण येऊन अनेक वेळा लहान मुलांना डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात किंवा चष्मा लागतो. यात अनेकदा डोळ्यांचा कोरडेपणा, खाज सुटणे, डोळ्यांच्या कडा लाल होणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे लहान मुलांच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही उपाय आणि त्यांना काही चांगल्या सवयी लावण्याची गरज असते.

 घ्या ‘ही’ काळजी

१. स्मार्ट फोन, टिव्ही आणि अन्य गॅजेट्स वापरण्याचा काळ मर्यादित करा

२. डिजिटल अभ्यासाव्यतिरिक्त मुल फार वेळ गेमिंग किंवा सर्चिंग करणार नाही याकडे लक्ष द्या.

३. मुलांना पुरेशी झोप मिळेल याकडे लक्ष द्या.

४. आहारात व्हिटॅमिन सी आणि ई, झिंक, ल्युटीन, झेक्सॅन्थेन आणि ओमेगा -3 फॅटी एसिडस् यांची मात्रा असलेले पदार्थ, फळे, भाज्या द्या.

५.० ते १७ वयोगटातील मुलांचे इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरावर मर्याचा आणणे फायदेशीर ठरेल.

६. हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.

(लेखक डॉ. हेमंत तोडकर हे अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमध्ये नेत्रतज्ज्ञ सल्लागार आहेत.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why do kids have glasses ssj