लहान मुले जागेपणी हसतात ही सामान्य गोष्ट आहे. परंतु ते झोपेत असताना देखील हसतात. तुम्हीही लहान बाळांना झोपेत हसताना पाहिले असेल आणि या गोष्टीचे तुम्हाला कुतूहलही वाटले असेल. यावेळी तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल की ही मुले झोपेत का हसत असतात? आपल्या समाजातील वयोवृद्ध म्हणतात की जेव्हा ही लहान मुले झोपेत देवाला पाहतात तेव्हा ते हसतात. परंतु ही गोष्ट खरी नाही. याच्या मागे वैज्ञानिक कारण आहे. आज आपण या गोष्टीची काही वैज्ञानिक आणि रंजक कारणे जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुलामध्ये भावनांचा विकास

जागेपणी लहान मुले अनेक आवाज ऐकत असतात, तसेच नवीन गोष्टी पाहत असतात. या दरम्यान मुलांचा विकसनशील मेंदू रोजचे अनुभव आणि माहिती रेकॉर्ड करू शकते आणि जेव्हा मूल झोपते तेव्हा ते या गोष्टींचे आकलन करतात. म्हणून जेव्हा मुलाला आनंदी भावना जाणवते तेव्हा ते झोपेत हसते. अशाप्रकारे लहान मुलांचे झोपेत हसणे त्यांच्या भावना विकसित होण्याचा एक भाग आहे.

Video : दुर्मिळ आजाराशी लढा देत, वयाच्या १४व्या वर्षी समुद्रावर राज्य करणारी भारताची जलपरी; गोष्ट अ’सामान्यांची – भाग १६

पोटातील गॅस बाहेर पडणे

असे मानले जाते की बाळ ३ ते ४ महिन्याचे झाल्यानंतर हसायला सुरुवात करते. मात्र सुरुवातीच्या काही आठवड्यांमध्ये जर बाळ हसत असेल तर कदाचित त्याच्या पोटातील गॅस बाहेर पडत असेल. तथापि, या बाबीशी निगडित कोणताही ठोस पुरावा नाही. तरीही, ही वस्तुस्थिती आहे की पोटाच्या समस्यांमुळे बाळांना चिडचिड होते आणि गॅस निघून गेल्यावर त्यांना आराम वाटतो. त्यामुळे लहान मुलं झोपेत हसण्याचे हे सुद्धा एक कारण असू शकते.

आरईएम स्लिप सायकल

आरईएम झोपेच्या वेळी, बाळाला काही शारीरिक बदल जाणवू शकतात, ज्यामुळे त्याच्या प्रतिक्षिप्त क्रियांना चालना मिळते आणि झोपेच्या वेळी बाळाला हसू येते. आरईएम झोपेच्या टप्प्यामुळे मुलांच्या डोळ्यांची वेगाने हालचाल होऊ शकते आणि ते स्वप्न देखील पाहू शकतात. जर तुम्ही लहान मुले झोपेत हसताना दिसली तर तर ते आपल्या आरईएम झोपेत असू शकतात.

मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी पॅडपेक्षा मेन्स्ट्रुअल कप अधिक उपयुक्त ? जाणून घ्या अधिक तपशील

अन्य वैद्यकीय कारण

जर तुमच्या मुलांमध्ये वजन कमी होते, झोपण्यात अडचणी, सतत चिडचिड होणे किंवा विनाकारण हसणे यासारखी लक्षणे दिसत असतील तर लगेचच आपल्या मुलाला डॉक्टरांकडे घेऊन जावे. यामुळे मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

लहान मुलांना झोपेत हसताना पाहणे केवळ हृदयस्पर्शीच नाही तर, हे बाळाचा भावनिक आणि शारीरिक विकास होत असल्याचं एक महत्त्वाचे लक्षण आहे. वेगवेगळ्या मुलांचे विकासाचे टप्पे वेगवेगळे असतात हे पालकांनी समजून घेणे महत्त्वाचे आहे. जर तुमचे मुलं एखादी गोष्ट उशिरा समजून घेत असेल तर त्यात काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या बाळाला त्याच्या गतीने विकसित होऊ द्या आणि या क्षणांचा आनंद लुटू द्या.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why do kids laugh while sleeping there are interesting reasons for this pvp