स्वयंपाकघरातील स्पंज हे आपल्या स्वयंपाकाघरातील अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे. चिकट डाग घालवण्यापासून ओटा साफ करण्यापर्यंत विविध कामांसाठी स्वयंपाक करात स्पंज वापरले जातात ज्यामुळे स्वयंपाक घरात स्वच्छता राखण्यास मदत होते. पण ते वेगवेगळ्या रंगाचे का असतात असा प्रश्न पडला आहे का? अलिकडे सोशल मिडिया सोशल मीडियावर शेअर करणाऱ्यात आलेल्या एका पोस्टने या स्वयंपाकघरातील स्पंज वेगवेगळ्या रंगाचे भिन्नतेकडे लक्ष वेधले आणि त्यामागील कारणांवर प्रकाश टाकला आहे. स्वयंपाकघरातील स्पंजचे वेगवेगळे रंग अनेकदा विशिष्ट वापर दर्शवतात:
“न शिजवलेल्या मांसाचा अंश असलेली भांडी धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्पंजचा वापर तयार अन्न तयार करणाऱ्यासाठी वापरल्या जाणारा ओटा स्वच्छ करण्यासाठी वापरू नये. लाल, नारिंगी आणि गुलाबी रंगाचे स्पंज हे सर्वात जास्त खरखरीत असतात आणि भांडी आणि तव्यांवरील सर्वात चिकट डाग आणि घाण काढून टाकण्यासाठी योग्य आहेत. हिरवे स्पंज हे भांडी धुण्यासाठी आदर्श आहेत. सिंकसारखा नाजूक पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी पिवळ्या स्पंजचा वापर करा. निळे स्पंज हे सर्वात कमी खरखरीत असतात आणि काच किंवा स्टेनलेस स्टीलसारख्या अतिशय नाजूक पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी वापरले जातात,” असे इंस्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये सांगितले आहे.
स्वयंपाकघरातील स्पंजचे वेगवेगळे रंग अनेकदा विशिष्ट वापर दर्शवतात : या दाव्यात काही तथ्य आहे का? (Is there any truth to this?)
या दाव्यामध्ये सांगितलेल्या माहितीची पडताळणी करण्यासाठी आणि सत्यता तपासण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने सेलिब्रिटी शेफ अनन्या बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधला. बॅनर्जी यांच्या मते, “स्वयंपाकघरात परस्पर दूषित(cross-contamination) होण्यापासून रोखण्यासाठी वेगवेगळ्या रंगाचे वापरले जाता. ही एक सामान्य पद्धत आहे. वेगवेगळे रंग सामान्यतः काय दर्शवतात ते येथे आहे:
पिवळा: सामान्य स्वयंपाकघरातील साफसफाईच्या कामांसाठी वापरला जातो.
हिरवा: चिकट डाग घासण्यासाठी किंवा बाहेरील साफसफाईसाठी योग्य.
निळा: काचेच्या वस्तू किंवा सहज स्क्रॅच होणाऱ्या पदार्थांसारख्या नाजूक पृष्ठभागांसाठी आदर्श.
गुलाबी/लाल: बहुतेकदा न शिजवलेल्या मांसासाठी वापरल्या जाणाऱ्या सिंक किंवा कटिंग बोर्डसारख्या जास्त जीवाणूंचा धोका असलेल्या क्षेत्रांच्या साफसफाईसाठी वापरला जातो.
स्पंजचा रंग मटेरियल आणि खरखरीतपणा दर्शवतो का?
बॅनर्जी असेही म्हणाले की, स्वच्छता आणि परस्पर दूषिततेच्या समस्यांव्यतिरिक्त, स्पंजचा रंग त्याच्या मटेरियल आणि खरखरीतपणाची पातळी देखील दर्शवू शकतो. हिरवे स्क्रबिंग पॅड अत्यंत खरखरीत असतात आणि ते अत्यंत चिकट आणि चिवट डागांच्या साफसफाईसाठी बनवलेले असतात. याउलट, पांढरे किंवा हलके रंगाचे पॅड अजिबात खरखरीत नसतात आणि नॉन-स्टिक कुकवेअरसारख्या नाजूक पृष्ठभागां स्वच्छ करण्यासाठी सुरक्षित असतात. एकाच वेळी अनेक काम करण्याची मुभा देणारा पर्याय म्हणजे पिवळ्या स्पंजसह येणारा हिरवा स्क्रब. सौम्य साफसफाईसाठी त्याची मऊ स्पंज असलेली बाजू वापरली जाते आणि अधिक चिकट डागांसाठी जास्त खरखरीत असलेला स्क्रबची बाजू वापरली जाते.