केस गळण्यामागे अनेक कारणे असू शकतात. ही अतिशय सामान्य समस्या आहे. परंतु काही पुरुषांमध्ये अचानक केस गळण्याची समस्या सुरु होते. केसगळतीमुळे पुरुषांच्या डोक्याच्या वरच्या बाजूला टक्कल पडू लागते. असे मानले जाते की जास्त ताण, वैद्यकीय स्थिती, औषधांचे सेवन किंवा पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे पुरुषांचे केस गळू लागतात. चला तर मग जाणून घेऊया या समस्येला कसे सामोरे जावे.

केसगळती रोखण्यासाठी या टिप्स करतील मदत

  • सर्व प्रथम, पुरुषांनी त्यांच्या केसांची योग्य काळजी घेतली पाहिजे. केस विंचरताना ते जास्त ओढू नयेत.
  • जेव्हा तुम्ही केस विंचराल तेव्हा रुंद दात असलेला कंगवा वापरा, जेणे करून तुमचे केस ओढले जाणार नाहीत.
  • केसांना गरम रोलर्स, कर्लिंग आयर्न, गरम तेल लावणे टाळा. यामुळे तुमचे केस खराब होऊ शकतात. या कारणामुळेही तुमचे केस गळायला लागतात.
  • रबर बँड, बॅरेट्स किंवा वेणी बांधल्याने केसांवर ताण येतो. त्यामुळे ते देखील टाळा.

तुम्हालाही येत असेल प्रमाणाच्या बाहेर राग, तर ‘या’ टिप्सचा वापर करून मिळवा रागावर नियंत्रण

  • बहुतेकदा तणावामुळे केस गळतात. त्यामुळे तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. यासाठी योगाभ्यास करा आणि आनंदी रहा.
  • कोणतेही औषध किंवा सप्लिमेंट डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. कारण काही वेळा औषधे घेतल्यावर केस गळणे सुरू होते.
  • सूर्यप्रकाश आणि अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या इतर स्रोतांपासून आपल्या केसांचे संरक्षण करा.
  • धूम्रपान- तंबाखू आणि अल्कोहोलचे सेवन बंद करा. कारण धूम्रपानामुळेही पुरुषांना टक्कल पडू शकते.

(येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया हे उपाय वापरण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.)

Story img Loader