शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी सेलिब्रिटीज अल्कलाइन पाणी पिताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान अल्कलाइन पाणी पिताना दिसली होती. क्रिकेटपटू विराट कोहली, मलायका अरोरा आणि अगदी फिल्ममेकर करण जोहर देखील तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी या काळ्या पाण्याचे सेवन करतात. अल्कलाइन वॉटर या सेलिब्रिटींना तंदुरुस्त ठेवते. प्रश्न असा पडतो की अल्कलाइन पाणी म्हणजे काय? चला तर मग जाणून घेऊया प्रसिद्ध सेलिब्रिटी अल्कलाइन वॉटर का पितात?
अल्कलाइन पाणी(Alkaline Water) म्हणजे काय?
डॉ. अजय अग्रवाल, फोर्टिस हॉस्पिटल नोएडा येथील अंतर्गत औषध विभागाचे संचालक आणि प्रमुख यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की अल्कलाइनचे पाणी अनेक आवश्यक खनिजांनी समृद्ध आहे. अल्कलाइन पाण्याची पीएच पातळी ८.८ आहे. एनसीबीआयमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार अल्कलाइन पाणी शरीराच्या अनेक समस्या दूर करते. याचे सेवन केल्याने शरीर दीर्घकाळ हायड्रेटेड राहते.
( हे ही वाचा: भारतात करोनाची चौथी लाट? प्रचंड वेगाने वाढतोय Omicron XBB चा धोका, ‘ही’ गोष्ट तुम्हाला वाचवू शकते)
हे पाणी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी खूप प्रभावी आहे. हे मेटाबॉलिज्म वाढवते आणि प्रतिकारशक्ती मजबूत करते. त्यात एंटी-एजिंग गुणधर्म देखील आहेत जे फ्री रॅडिकल्स फिल्टर करतात. सामान्य पाण्याची पीएच पातळी ६ ते ७ असते ज्यामध्ये जवळजवळ कोणतेही खनिज नसते तर अल्कलाइन पाण्याचा पीएच हा ८ पेक्षा जास्त असतो.
काळ्या पाण्याचे कोणते फायदे आहेत, ज्यामुळे बहुतेक सिलेब्रिटी त्याचे सेवन करतात, जाणून घ्या
- काळ्या पाण्यात असलेली नैसर्गिक खनिजे सर्व पोषक तत्वांचे शोषण आणि प्रक्रिया वाढवतात. हे शरीरातील विविध पोषक घटकांचे विघटन करण्यास मदत करते.
- याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीर निरोगी राहते.
- शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते. अल्कलाइन पाण्यातील लहान पाण्याचे रेणू पेशींद्वारे अधिक सहजपणे शोषले जातात आणि सामान्य पाण्यापेक्षा जास्त हायड्रेटिंग असतात.
( हे ही वाचा: ‘या’ तीन आजारांमध्ये तुपाचे सेवन विषासारखे काम करते; आयुर्वेदातून जाणून घ्या यापासून संरक्षण कसे करावे)
- अल्कलाइन पाणी पचन सुधारते आणि ऍसिडिटी आणि पेप्टिक अल्सरपासून आराम देते.
- हे पाणी आतड्यात सहज शोषले जाते आणि अनेक रोगांशी लढण्याची ताकद देते.
- या पाण्याचा त्वचेवरही चांगला परिणाम होतो. हे वृद्धत्वाच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवते.