The right way to drink milk and water: दूध प्यायल्यानंतर जर तुम्हाला तुमचे पोट फुगल्यासारखे वाटत असेल किंवा तुम्हाला गॅस होऊ लागलाय असं वाटतं असेल तर त्यामागे दूध पिण्याची चुकीची पद्धत कारणीभूत ठरू शकते. होय, आयुर्वेदानुसार खाण्यापिण्याबाबत अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचे पालन न केल्यास व्यक्तीमध्ये आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. यातील एक समस्या म्हणजे पाणी आणि दूध पिण्याची चुकीची पद्धत. उभं राहून दूध प्यावे आणि बसून पाणी प्यावे हे आपल्या आयुर्वेदात सांगितले जाते. उभं असताना दूध आणि बसून पाणी पिण्याचा सल्ला का दिला जातो ते जाणून घेऊया.

उभे राहून दूध का प्यावे?

आयुर्वेदानुसार दूध थंड, वात आणि पित्त दोष संतुलित ठेवण्याचे काम करते. जे लोक बसून दूध पितात त्यांना पचनाचा त्रास होतो. यामुळेच आयुर्वेदात रात्री झोपण्यापूर्वी किंवा संध्याकाळच्या जेवणानंतर दोन तासांनी कोमट दूध उभं राहून पिण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून व्यक्तीला त्याचा पूर्ण फायदा मिळू शकेल आणि आरोग्याशी संबंधित समस्या देखील उद्भवणार नाहीत.

Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
Fight Winter Cold Cough with lemon and clove water
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Viral Video Shows Pet Dog Help Her Owner
मैं हूँ ना…! मालकिणीला मदत करण्यासाठी श्वानाची धडपड; काठी काढण्यासाठी मारली उडी अन्… पाहा VIRAL VIDEO
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर

( हे ही वाचा: Heart Health: हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी दिवसातून किती वेळ चालणे आवश्यक आहे? जाणून घ्या)

उभे राहून दूध पिण्याचे फायदे

उभे राहून दूध प्यायल्याने गुडघ्यांना इजा होत नाही, तसंच ते स्नायूंसाठी फायदेशीर आहे, उभे राहून दूध प्यायल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो. जर तुम्हाला हृदयविकार आणि उच्च रक्तदाबापासून सुटका हवी असेल तर उभे राहून दूध प्या. तसेच ते तुमच्या डोळ्यांसाठी आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.

बसून पाणी का प्यावे ?

आयुर्वेदानुसार, उभे राहून पाणी प्यायल्याने अन्न आणि हवेच्या पाईपमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो. ज्याचा परिणाम फक्त फुफ्फुसावरच नाही तर हृदयावरही होतो. याशिवाय उभं राहून पाणी प्यायल्यास, पाण्याच्या जास्त प्रमाणामुळे पोटाच्या खालच्या बाजूच्या भिंतींवर दाब निर्माण होतो, ज्यामुळे पोटाच्या सभोवतालच्या अवयवांचे मोठे नुकसान होते. या वाईट सवयीमुळे अनेकांना सांधेदुखी आणि हर्नियाचा त्रास सहन करावा लागतो. न थांबता पाणी प्यायल्याने अॅसिडीटी, गॅस, ढेकर येणे यासारख्या समस्याही होतात. उभे राहून कधीही पाणी पिऊ नका. नेहमी बसून पाणी प्या.

( हे ही वाचा: ‘या’ गोष्टी फ्रीजमध्ये ठेवण्याची चूक कधीही करू नका, आरोग्याचे मोठे नुकसान होऊ शकते)

बसून पाणी पिण्याचे फायदे

अभ्यासानुसार, बसून पाणी प्यायल्याने पाण्याचे योग्य पचन होते आणि शरीरातील सर्व पेशींपर्यंत पोहोचते. व्यक्तीच्या शरीराला आवश्यक तेवढे पाणी शोषून घेऊन उरलेले पाणी आणि विषारी द्रव्ये लघवीद्वारे शरीरातून बाहेर टाकतात. बसून पाणी प्यायल्याने हानिकारक पदार्थ रक्तात विरघळत नाहीत, तर ते रक्त स्वच्छ करतात. त्यामुळे बसून पाणी पिणे चांगले मानले जाते.