जेवणाचा आनंद घ्यायचा असेल तर जेवणाबरोबर लोणचे, पापड अथवा कोशिंबीर असे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. सहसा अनेकांना कैरी, लिंबू आणि मिरचीचे खायला आवडते पण तुम्ही जर थोडे हटके पर्याय ट्राय करू इच्छित असाल तर तुम्ही गाजराचे लोणचे खाऊ शकता. याची चव उत्कृष्ट असतेच पण त्याचबरोबर ते आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते. विशेषत: हिवाळ्यात गाजराचे लोणचे खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. याबाबत इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना षोषणतज्ज्ञ लीमा महाजन यांनी पांरपारिक रेसिपी सांगितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गाजराचे लोणचे कसे करावे?
साहित्य

गाजर
मोहरीचे तेल
हिरव्या मिरच्या
हिंग
पाणी
मीठ
मेथी दाणे (मेथी दाणे)
जिरे (जिरा)
हळद
तिखट
चिंचेचे पाणी
धणे पूड
गरम मसाला
काळे मीठ

पद्धत

  • गाजर मध्यम लांबीच्या काप करून घ्या आणि पांढरा भाग देखील काढून टाका.
  • एका भांड्यात हिंग (हिंग) घेऊन थोडे पाणी घालून बाजूला ठेवा.
  • कढईत मोहरीचे तेल गरम करून त्यात मेथीचे दाणे, जिरे, चिरलेली गाजर, चिरलेली हिरवी मिरची, हिंग पाणी, मीठ, तिखट आणि हळद घाला.
  • ते चांगले एकत्र होऊ द्या आणि ते झाकणाने झाकून ठेवा. काही वेळाने चाकूने तपासा, गाजर मऊ असल्यास त्यात चिंचेचे पाणी, धनेपूड, गरम मसाला, आणि काळे मीठ टाका.
  • झाकणाने झाकून ४-५ मिनिटांनी तपासा. गाजराचे लोणचे खाण्यासाठी तयार आहे.

गजराचे लोणचे का खावे?
मुंबईतील रेजुआ एनर्जी सेंटरच्या पोषणतज्ञ डॉ. निरुपमा राव यांनी सांगितले की, या हंगामत भरपूर ताजे गाजर उपलब्ध असल्यामुळे हिवाळ्यात गाजराचे लोणचे आवडीने खाल्ले जाते. “ही प्रक्रिया केवळ गाजर टिकवून ठेवण्याबरोबरच आंबट-तिखट चवदेखील निर्माण करते ज्यामुळे हिवाळ्यातील एक आनंददायक आणि पौष्टिक नाश्ताचा पर्याय मिळतो.”

गाजर हे बीटा-कॅरोटीनने समृद्ध असता, व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते जे दृष्टी निरोगी होण्यासाठी, त्वचा आणि रोगप्रतिकार शक्त सुधरण्यासाठी आवश्यक आहे. गाजराचे लोणचे तयार करण्याच्या किण्वन(आंबवणे) प्रक्रियेमध्ये प्रोबायोटिक्स (आतड्याच्या आरोग्यासाठी उपयुक्त बॅक्टेरिया निर्माण करणे) ज्यातून पौष्टिक घटक शरीराला मिळतात.

हेही वाचा – हिवाळ्यात गाजरचा ज्युस ठरतोय आजारांवर रामबाण उपाय; फायदा जाणून घ्याल तर नेहमी प्याल

याव्यतिरिक्त, लोणच्याच्या पदार्थांचे आरोग्य फायदे आहेत असे मानले जाते, ते जीवनसत्त्वे आणि प्रोबायोटिक्सचा चांगला स्रोत आहे, डॉ राव म्हणाले.

गाजराचे लोणचे आंबवण्याची प्रक्रिया लॅक्टोबॅसिलस ( Lactobacillus )सारख्या प्रोबायोटिक्सच्या वाढीस प्रोत्साहन देते. लॅक्टोबॅसिलस हे त्याच्या पाचक आरोग्यावर सकारात्मक प्रभावासाठी ओळखले जाते. “हे जीवाणू आतड्यांतील मायक्रोबायोम संतुलित ठेवण्यासाठी योगदान देतात, पोषक घटक शोषण्यास मदत करतात आणि रोगप्रतिकारक शक्तीला समर्थन देतात. याव्यतिरिक्त, आंबवण्याची प्रक्रियेमुळे काही पोषक घटकांची जैवउपलब्धता (Bioavailability)वाढू शकते, ज्यामुळे त्यांचे पचनक्रियेत पोषक घटकांचे शोषण करण्याची क्षमता वाढते,” असे अहमदाबादच्या झाइडस हॉस्पिटल्सच्या मुख्य आहारतज्ज्ञ श्रुती के भारद्वाज यांनी सांगितले.

भारद्वाज यांच्या मते, गाजराच्या लोणच्यामध्ये असलेले प्रोबायोटिक घटक देखील निरोगी पद्धतीने वजन वाढवण्यास आणि चयापचय सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. “प्रोबायोटिक्सचा चयापचय कार्य सुधारण्याशी संबंध आहे, जे संभाव्यतः वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. याशिवाय, गाजरातील अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे, प्रोबायोटिक्ससह शरीरातील दाह कमी करण्यासाठी मदत करते, ज्यामुळे एकंदर आरोग्याच्या कल्याणासाठी योगदान मिळते,” असे भारद्वाज म्हणाले.

हेही वाचा – सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झळ! मांसाहारी आणि शाकाहारी थाळीच्या किंमतीत नोव्हेंबरमध्ये ५ ते २० टक्यांनी झाली वाढ

काय लक्षात ठेवावे?
सोडियम घटकांमुळे लोणचेयुक्त पदार्थ कमी प्रमाणात खाणे आवश्यक आहे, असे भारद्वाज म्हणाले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why eat pickled carrots in winter learn the benefits from the experts note the easy recipe snk
Show comments