‘रक्षाबंधन’ हा सण बहिण भावाच्या नात्याचा सण म्हणून साजरा केला जातो. रक्षाबंधनाला प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीच्या संरक्षणाचे वचन देतो. ही प्रथा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. बहिणींना संरक्षणाची नव्हे तर प्रेमाची गरज असते. भावांनी इतर पुरुषांच्या बहिणींना त्रास न वचन दिले तर तुमच्या बहिणींना संरक्षणाची गरज पडणार नाही. रक्षबंधन असो कि भाऊबीज नेहमी भावाने बहिणीला रक्षण करण्याचे वचन दिले जाते पण आपल्या भावाला देखील रक्षणाची गरज पडू शकते याचा विचार तुम्ही बहिण म्हणून कधी केला आहे का? पुरुषत्वाच्या नावाखाली तुमच्या भावाला समजाच्या अपेक्षेच्या ओझ्याखाली दाबले जात आहे हे तुम्हाला जाणवते का? त्यांना मोकळेपणाने रडण्याचे देखील स्वातंत्र्य दिले जात नाही आणि भाऊ लहान असो किंवा मोठा बहिणीचे रक्षण करणे, आई-वडीलांचा सांभाळ करणे, पत्नी आणि मुलांच्या गरजा भागविणे अशा कित्येक जबाबदार्यांचे ओझे त्याच्यावर लादले जात आहे हे तुम्हाला जाणवते का? इतकं सर्व सहन करूनही तुमच्या भावाला मोकळेपणाने भावना व्यक्त करता येत नाही. जबाबदारी झेपत नसली तरी त्यांच्याकडे हार मान्याचा पर्याय नसतो. कितीही त्रास होत असला तरी कोणाला काहीही न सांगता ते आयुष्यातील अडचणींचा सामना करत राहतात. दादा तुला काही मदत हवी आहे? दादा काही बोलायचं आहे का? हे प्रश्न तुम्ही कधी तुमच्या भावाला विचारले आहे का? नसेल तर या रक्षाबंधनाला तुमच्या भावाला हे प्रश्न नक्की विचारा. तुमच्या भावाला तुमच्या आधाराची गरज आहे. समजाच्या अपेक्षा आणि कुटुंबाच्या जबाबदारीच्या ओझ्याखाली दाबल्या गेलेल्या भावाचे प्रत्येक बहिणीने रक्षण केले पाहिजे. तुमच्या भावाची मदत कशी करावी जाणून घ्या
१) विषारी पुरुषत्वापासून त्याचे रक्षण करणे (Protecting Him From Toxic Masculinity)
विषारी पुरुषत्वाची संकल्पना आपल्या समाजात खोलवर गुंतलेली समस्या आहे. पुरुषत्वाच्या नावाखाली पुरुषांना मोकळेपणाने रडू दिले जात नाही. जबाबदाऱ्यांचे ओझे लादले जाते पण त्यामुळे होणारी घुसमट निमुटपणे त्यांना सहन करावी लागते. त्यामुळे पुरुषांच्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होत असतो. पण एक बहिण म्हणून तुम्ही तुमच्या भावासाठी हे सर्व काही बदलू शकता. तुमच्या भावांना असुरक्षितता स्वीकारण्यासाठी, त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि मोकळेपणाने व्यक्त होण्यासाठी प्रोत्साहित करा. त्यांना सांगा की, तुम्हाला रडू येत असेल मोकळेपणाने रडा आणि तुम्हाला खचल्यासारखे वाटत असेल तर ही अगदी सामान्य गोष्ट आहे. तुमच्या भावाला हवा असलेला भावनिक आधार द्या.
२) तुमच्या भावाला चांगले नातेसंबंध तयार करण्यात मदत करा (Help Him Build Healthy Relationships)
नाते कोणतेही असे प्रेमसंबधाचे असो किंवा व्यावसायिक असो, प्रत्येक नात्यात अडचणी येतात. प्रत्येक प्रश्नाची सर्व उत्तरे तुमच्याकडे कधीच असू शकत नाहीत. अशा स्थितीत तुमच्या भावाला मदत करा. आपला समाज पुरुषांना नातेसंबंधांवर लक्ष ठेवायला शिकवतो, ते संबध सांभाळायला शिकवत नाही. संवाद साधणे, सहानुभूती व्यक्त करणे आणि तडजोड करणे याविषयी तुमचा सल्ला तुमच्या भावांना नाते जपण्यास आणि प्रेमळ नातेसंबंधा तयार करण्यासाठी मार्गदर्शन करू शकतो. परस्पर आदर, समोरच्याचे मत ऐकून घेणे आणि मुक्तपणे संवादाचे महत्त्व त्या पटवून द्या.
३) तुमच्या भावाला भावनिक आधार द्या. (Be His Emotional Mentors)
भावना समजून घेण्याची आणि हातळण्याची क्षमता ही जीवनातील आव्हानांचा सामना करण्याचा एक महत्त्वाचा पैलू आहे. भावनांवर मोकळेपणाने चर्चा करून आणि त्यांना हाताळण्यासाठी काही धोरणे आखून भावनिक बुद्धिमत्तेला चालना देण्यात बहिण म्हणून तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. आपल्या भावाच्या भावना जाणून घ्या. तुमच्यासह चर्चा केलेल्या गोष्टी तुमच्या दोघांमध्ये राहतील असा विश्वास द्या. बहिणी म्हणून तुम्ही तुमच्या भावाची भावनिक लवचिकता विकसित करण्यात योगदान देऊ शकता. त्यामुळे तुमचे नाते घट्ट होईल आणि तणाव हाताळण्यासाठी, प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील संघर्षांचा सामना करण्यासाठी सुसज्ज करते.
“पुरुषही रडतात, हे सामान्य गोष्ट” यासारखी साधी गोष्ट त्याच्यासाठी जग बदलू शकते. तुमच्या भावाने एखाद्या व्हिडिओमध्ये हे ऐकले असेल आणि सोशल मीडियावर वाचले असेल, पण जेव्हा जवळच्या व्यक्ती जेव्हा हे सागते तेव्हा त्यांना तेव्हा ते अधिक खरे वाटते.
४) सन्मान आणि संमतीबद्दल भावासह बोला (Talk To Him About Dignity & Consent)
प्रत्येक मुलीला सन्मानाने का वागवावे, मुलींच्या संमतीने कोणतीही गोष्ट का करावी हे बहिण म्हणून तुम्ही तुमच्या भावाला पटवून देऊ शकता. मुलगी म्हणून तुमच्यासाठी सर्व परस्परसंवाद आणि नातेसंबंधांमध्ये संमती घेण्याच्या महत्त्व तुम्ही तुमच्या भावाला पटवून देऊ शकता. मुलगी म्हणून तुम्हाला सन्मानाने कसे आणि का वागवले हे पाहिजे हे तुमच्या भावाला सांगा. मुलगी म्हणून सन्मान आणि संमतीचे महत्त्व आपल्या भावाला पटवून देणे प्रत्येक बहिणीचे कर्तव्य आहे.
ही शिकवण त्याच्या जीवनाचा काय अविभाज्य भाग बनेल याची तुम्ही कल्पना करू शकता. पुरुषांना योग्य वेळी योग्य गोष्टी शिकवून आपण आपल्या समाजाला स्त्रियांसाठी अधिक चांगले आणि सुरक्षित स्थान बनवण्यास सुरुवात करतो.
५) लैंगिक असमानतेबद्दल सर्वात छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टापर्यंत त्याला सांगा (Make Him Aware About The Smallest & Biggest Of Gender Inequalities
लैंगिक समानतेचे पुरस्कर्ते म्हणून तुम्ही तुमच्या भावालारूढी आणि पूर्वग्रहांना आव्हान देण्यासाठी प्रेरित करू शकता. न्याय्य समाज निर्माण करण्याच्या प्रवासात त्यांची मदत घ्या. मुलगी म्हणून समान संधीची अपेक्षा करताना जबाबदाऱ्यांचे समान वाटप होईल याची काळजी घ्या. लैंगिक असमानता निर्माण करण्याच्या दिशेने हे छोटे पाऊल आहेत पण तुम्ही तुमच्या भावाच्या बरोबरीने घराची जबाबदारी घेतली तर त्याच्यावरील जबाबदाऱ्यांचे ओझे कमी होईल.
समान संधी आणि न्याय्य वागणुकीचे महत्त्व तुमच्या भावाला पटवून द्या. स्त्री पुरुष असा भेदभाव करणाऱ्या सामाजिक नियमांना आव्हान देण्यास भावांना प्रोत्साहित करा. त्यामुळे समाजात असे पुरुष निर्माण होतील जे स्त्रीयांचे सशक्तीकरणात हातभार लावतील. पुरुष म्हणून महिलांसाठी केवळ सहानुभूती न दाखवता नाहीत तर प्रत्येक स्त्रीची क्षमता ओळखून तिला समान संधी देतील.
हेही वाचा – Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधनला भावाला १५०० रूपयांपर्यंत द्या सर्वात हटके गिफ्ट, पाहा लिस्ट
६) तुमच्या भावाला एक चांगला पिता, मुलगा, भाऊ आणि जोडीदार होण्यासाठी मदत करा ( Make Him A Better Father, Son, Brother & Partner)
तुम्ही तुमच्या भावाला जी मूल्ये शिकवली आहेत ती भविष्यात त्यांच्या स्वतःच्या मुलांचे संगोपन करण्याच्या पद्धतीला आकार देईल. सहानुभूती, दयाळूपणा आणि आदर या भावनांना प्रोत्साहन देऊन भावनिक नातेसंबध आणि लैंगिक समानतेला प्राधान्य देाणारा चांगला वडील होण्यास त्याला मदत करू शकता.
पालकत्वाचा प्रवास बालवयात झालेल्या संस्कारातून सुरू होतो. पालकत्वाबद्दल त्यांच्या भावांचा दृष्टीकोन तयार करण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकता. योग्य गुणांना चालना देऊन आणि योग्य संभाषण करून बहिण म्हणून तुम्ही तुमच्या भावाला चांगला पिता, पुत्र आणि जोडीदार होण्यासाठी मदत करत आहात.