‘रक्षाबंधन’ हा सण बहिण भावाच्या नात्याचा सण म्हणून साजरा केला जातो. रक्षाबंधनाला प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीच्या संरक्षणाचे वचन देतो. ही प्रथा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. बहिणींना संरक्षणाची नव्हे तर प्रेमाची गरज असते. भावांनी इतर पुरुषांच्या बहिणींना त्रास न वचन दिले तर तुमच्या बहिणींना संरक्षणाची गरज पडणार नाही. रक्षबंधन असो कि भाऊबीज नेहमी भावाने बहिणीला रक्षण करण्याचे वचन दिले जाते पण आपल्या भावाला देखील रक्षणाची गरज पडू शकते याचा विचार तुम्ही बहिण म्हणून कधी केला आहे का? पुरुषत्वाच्या नावाखाली तुमच्या भावाला समजाच्या अपेक्षेच्या ओझ्याखाली दाबले जात आहे हे तुम्हाला जाणवते का? त्यांना मोकळेपणाने रडण्याचे देखील स्वातंत्र्य दिले जात नाही आणि भाऊ लहान असो किंवा मोठा बहिणीचे रक्षण करणे, आई-वडीलांचा सांभाळ करणे, पत्नी आणि मुलांच्या गरजा भागविणे अशा कित्येक जबाबदार्यांचे ओझे त्याच्यावर लादले जात आहे हे तुम्हाला जाणवते का? इतकं सर्व सहन करूनही तुमच्या भावाला मोकळेपणाने भावना व्यक्त करता येत नाही. जबाबदारी झेपत नसली तरी त्यांच्याकडे हार मान्याचा पर्याय नसतो. कितीही त्रास होत असला तरी कोणाला काहीही न सांगता ते आयुष्यातील अडचणींचा सामना करत राहतात. दादा तुला काही मदत हवी आहे? दादा काही बोलायचं आहे का? हे प्रश्न तुम्ही कधी तुमच्या भावाला विचारले आहे का? नसेल तर या रक्षाबंधनाला तुमच्या भावाला हे प्रश्न नक्की विचारा. तुमच्या भावाला तुमच्या आधाराची गरज आहे. समजाच्या अपेक्षा आणि कुटुंबाच्या जबाबदारीच्या ओझ्याखाली दाबल्या गेलेल्या भावाचे प्रत्येक बहिणीने रक्षण केले पाहिजे. तुमच्या भावाची मदत कशी करावी जाणून घ्या
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा