Food Poisoning In Summer: उन्हाळ्यात अन्नाद्वारे विषबाधा होण्याची समस्या होऊ शकते. या काळात वाढत्या उष्णतेमुळे शरीरावर परिणाम होत असतो. अशात खाण्यापिण्याकडे नीट लक्ष न दिल्याने विषबाधा म्हणजेच Food Poisoning होण्याची शक्यता वाढत जाते. अशा वेळी उलटी, डोकेदुखी, मळमळ, पोटात तीव्र वेदना, जुलाब या समस्या सुरु होतात. काही वेळेस थकवा देखील जाणवतो. विषबाधा झाल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जाऊन उपचार करवून घेणे आवश्यक असते. त्रासाचे प्रमाण कमी असल्यास काही घरगुती उपाय करता येतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Food Poisoning कधी होते?

जेव्हा एखादा पदार्थ खराब होतो, तेव्हा त्या पदार्थावर हानिकारक जीवाणू, विषाणू असतात. असे पदार्थ खाल्याने विषबाधा होऊ शकते. सोप्या शब्दात खराब झालेल्या अन्नपदार्थांचे सेवन केल्याने फूड पॉयझनिंगचा त्रास होऊ शकतो. जेवणामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या पदार्थांवरदेखील ही गोष्ट अवलंबून असते. उदा. जेवणामध्ये कांदा वापरल्याने ते जास्त काळ टिकत नाही. काही तासांनंतर लगेच खराब होते. याशिवाय जेवण जास्त कालावधीसाठी ते खराब होऊ शकते. अस्वच्छ वातावरणामुळेही फूड पॉयझनिंग होण्याचा धोका असतो. आजारी व्यक्तीने जेवणाला स्पर्श केल्याने त्याच्या शरीरातील विषाणू जेवणामध्ये जाऊन ते खराब होऊ शकते. तसेच जेवण बनवताना वापरल्या जाणाऱ्या वस्तू अस्वच्छ असल्यास विषबाधा होण्याची शक्यता असते.

उन्हाळ्यात फूड पॉयझनिंगचा त्रास का वाढतो?

आपल्याकडे अधिक प्रमाणात जेवण तयार केले जाते. त्यामुळे उरलेले अन्न फेकून न देता काही कालावधीसाठी साठवले जाते. उन्हाळ्यात गरम वातावरणामध्ये साठवलेले पदार्थ लवकर खराब होतात. या पदार्थांमध्ये विषाणू, जीवाणू असू शकतात. असे पदार्थ खाल्याने विषबाधा होण्याचा धोका वाढतो.

आणखी वाचा – गरोदरपणात उच्च रक्तदाबाचा त्रास का वाढतो? रक्तदाब नियंत्रणात राहावा यासाठी फॉलो करा ‘या’ ५ सोप्या टिप्स

उन्हाळ्यामध्ये विषबाधा होऊ नये यासाठी काय करावे?

सर्वप्रथम जास्तीचे जेवण बनवणे सोडून द्यावे. एकदा तयार केलेले ताजे पदार्थ लवकरात लवकर खावे. शिळे पदार्थ खाणे टाळावे. याव्यतिरिक्त फास्ट फूड, जंक फूड किंवा प्रोसेस्ड फूड यांपासून लांब राहावे. प्लॅस्टिकच्या पाकिटांमध्ये ठेवले जाणाऱ्या पदार्थांवरही उष्णतेचे प्रभाव होत असतो. काही वेळेस ते पाकिटांमध्ये असतानाही खराब होऊ शकतात. असे पदार्थ खाल्याने विषबाधा होण्याचा धोका वाढत जातो. फूड पॉयझनिंगचा त्रास व्हायला लागल्यास आले, लिंबू, केळी, अ‍ॅपल सायडर व्हिनेगर या पदार्थांची मदत घ्यावी. स्थिती बिघडत असल्यास डॉक्टरांकडून उपचार करवून घ्यावे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why food poisoning occurs more in summer know reason causes and prevention yps