ख्रिश्चन बांधवांसाठी ख्रिसमस (नाताळ) हा सण महत्त्वाचा असून दरवर्षी २५ डिसेंबरला साजरा केला जातो. जगभरात प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. युरोपियन देशात या दिवसाचं औचित्य साधत शोभायात्रा काढल्या जातात. यातून प्रभू येशूंची जीवनकार्य दाखवलं जातं. हा सण ख्रिस्ती धर्मियांसोबत इतर धर्माचे लोकही साजरा करतात. या सणाबद्दल लहान मुलांमध्ये सर्वाधिक उत्साह दिसून येतो. महिनोंमहिने या दिवसाची मुलं आतुरतेने वाट पाहात असतात. या दिवशी सांता क्लॉज मुलांना भेटवस्तू देतात, अशी मान्यता आहे. पालक त्या रुपाने मुलांना भेटवस्तू देत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ख्रिसमसचं महत्व

ख्रिसमस सणाकडे एक सांस्कृतिक उत्सव म्हणूनही पाहिलं जातं. प्रभू येशू यांचा जन्म या दिवशी झाल्याने ख्रिस्ती धर्मियांमध्ये उत्साह असतो. ख्रिसमस सण फक्त एक दिवस नाही, lj १२ दिवस साजरा केला जातो. ख्रिसमस सण पूर्वसंध्येला सुरु होतो. चर्चमध्ये धार्मिक प्रार्थनेचं आयोजन केलं जातं आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. त्यानंतर एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात. घरी केक, गोड पदार्थ केले जातात. कुटुंबियांसोबत हा सण एकत्र साजरा केला जातो. तसेच घराबाहेर कंदील आणि प्रभू येशूंच्या जन्माचे देखावे केले जातात.

कसा सुरु झाला ख्रिसमस सण?

ख्रिश्चन धर्मियांच्या मान्यतेनुसार, प्रभु येशू म्हणजेच येशू ख्रिस्ताचा जन्म बेथलेहेममध्ये मेरी आणि जोसेफ यांच्या पोटी झाला. सेक्स्टस ज्युलियस आफ्रिकनसने २२१ मध्ये पहिल्यांदा २५ डिसेंबर हा येशूचा वाढदिवस म्हणून साजरा केला. या दिवसाला ख्रिसमस-डे म्हणण्याचे एक कारण म्हणजे हिवाळी संक्रांतीच्या वेळी रोमन लोक २५ डिसेंबर रोजी सूर्याचा जन्म साजरा करतात. दुसरीकडे असंही एक मत आहे की, जगाच्या निर्मितीच्या चौथ्या तारखेला (२५ मार्च) मेरीची गर्भधारणा झाली. याच्या बरोबर ९ महिन्यांनी म्हणजे २५ डिसेंबर रोजी येशूचा जन्म झाला.

पाकिस्तानातील एका बेकरीत केकवर ‘Merry Christmas’ लिहिण्यास स्टाफचा नकार; मॅनेजमेंटने हात केले वर

सांता क्लॉज

सांता निकोलस यांना सांता क्लॉजच्या नावाने ओळखलं जाते. त्यांचा जन्म प्रभू येशूनंतर जवळपास २८० वर्षांना झाला होता. सांता निकोलस यांनी आपलं पूर्ण जीवन प्रभू येशूंना समर्पित केलं होतं. दरवर्षी ते येशूच्या जन्मदिनाचं औचित्य साधत अंधारात मुलांना भेटवस्तू द्यायचे. तेव्हापासून आतापर्यंत ही प्रथा आहे. आजही लोकं सांता क्लॉज बनून मुलांना भेटवस्तू देतात.

ख्रिसमस ट्री

ख्रिसमस सणादिवशी ख्रिसमस ट्री सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. या दिवशी या झाडाची विशेष सजावट केली जाते. काही ठिकाणी ख्रिसमस ट्रीवर गिफ्ट लावलेली पाहायला मिळतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is christmas celebrated on 25th december rmt