रात्रीची नखे का कापू नयेत? हा तो प्रश्न आहे जो आजवर अनेकांना पडला असेल. प्रत्येक घरातील वडीलधारी मंडळी रात्रीची नखे कापण्यापासून अडवतात, परंतु खूप कमी वेळा असे न करण्यामागचे योग्य कारण सांगितले जाते. यामुळे आज आपण फक्त या प्रश्नाचे उत्तरच जाणून घेणार नाही आहोत, तर नखं कापण्याची योग्य वेळ आणि पद्धतही माहित करून घेणार आहोत.
अमेरिकन अकॅडेमी ऑफ डर्मेटॉलॉजी असोसिएशननुसार, आपली नखे केरेटिनने बनलेली असतात. म्हणूनच अंघोळ केल्यांनतर नखे कापणे चांगले मानले जाते. कारण पाण्यात भिजल्यामुळे आपली नखे सहज कापली जातात. परंतु जेव्हा आपण रात्रीची नखे कापतो तेव्हा पाण्यासोबत संपर्क आलेला नसल्याने ती कडक होतात आणि कापताना आपल्याला त्रास होऊ शकतो.
तुम्हालाही येत असेल प्रमाणाच्या बाहेर राग, तर ‘या’ टिप्सचा वापर करून मिळवा रागावर नियंत्रण
रात्रीची नखे न कापण्याचे दुसरे कारण म्हणजे पूर्वीच्या काळी लोकांकडे नेलकटर नव्हते त्यावेळी लोक चाकू किंवा एखाद्या धारदार वस्तूने नखं कापायची. तसेच, त्यावेळी वीजदेखील नसल्याने पूर्वीचे लोक रात्रीच्या अंधारात नखे कापण्यास मनाई करत असत. पण काळाच्या ओघात लोकांनी त्याला अंधश्रद्धेशी जोडले. काही लोक अजूनही त्यावर विश्वास ठेवतात आणि आपल्या मुलांनाही ते पाळण्यास सांगतात. जेणेकरून कोणत्याही प्रकारची शारीरिक हानी टाळता येईल.
नखे कापण्याची योग्य पद्धत
नखे कापण्यापूर्वी ती काही वेळ हलक्या तेलात किंवा पाण्यात बुडवून ठेवावी. यामुळे आपली नखे नरम होतील आणि तुम्ही ती सहज कापू शकाल. नखे कापल्यानंतर त्यांना मॉइश्चरायझ करायला विसरू नये. तसेच, नखे कापल्यानंतर हात धुवावे. हात सुकल्यानंतर नखांना मॉइश्चरायझर किंवा तेल लावल्याने आपली नखं नेहमी सुंदर दिसतील.
तुम्ही कधी उलट चालण्याचा प्रयत्न केला आहे का? आहेत अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे
कधीही बसून नखे कापू नयेत
नेहमी लोक आपल्या सोयीनुसार कुठेही बसून नखं कापायला लागतात. ही अत्यंत चुकीची सवय आहे. बोर्ड किंवा कोणत्याही मजबूत पृष्ठभागावर हात ठेवून आरामात नखे कापावी. नखे कापल्यानंतर ही नखे आठवणीने कचऱ्याच्या डब्यात टाका. कधीही कपड्यांवर किंवा फर्निचरवर नखे कापू नयेत.
क्युटिकल्स कापू नका
क्युटिकल्स नखांच्या मुळांचे संरक्षण करतात. पण जेव्हा तुम्ही तुमची क्यूटिकल कापता तेव्हा बॅक्टेरिया आणि इतर जंतू तुमच्या शरीरात प्रवेश करू लागतात. यामुळे, नखांमध्ये संसर्ग होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो, जे काहीवेळा बरे होण्यासाठी बराच वेळ लागतो. म्हणून, तुमचे क्युटिकल्स कापणे टाळा.
(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)