करोना महामारीनंतर आरोग्य विमा घेणे महत्त्वाचे झाले आहे. कारण ते तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्यासाठी मदतीचा आधार देते. त्याच वेळी, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आता लोक हॉस्पिटलमध्ये दाखल होणारा खर्च टाळण्यासाठी आरोग्य विमा घेत आहेत. एवढेच नाही तर कोणता आरोग्य विमा घ्यावा की घेऊ नये याचाही अनेक जण विचार करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाजारात अनेक प्रकारच्या आरोग्य विमा योजना उपलब्ध आहेत, त्यामुळे लोकांनी कोणतीही योजना घेताना सावधगिरी बाळगली पाहिजे आणि स्वतःसाठी योग्य आरोग्य विमा कवच निवडायला हवा. यामुळे तुमच्या हॉस्पिटलायझेशनच्या खर्चाची चिंता बर्‍याच प्रमाणात कमी होते. जर तुम्हाला आरोग्य विमा घ्यायचा असेल आणि तो तुमच्यासाठी का महत्त्वाचा आहे हे जाणून घ्यायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.

तुमच्या गुंतवणुकीची सुरक्षितता

अनेकदा लोक भविष्याचा विचार करून पैसे गुंतवतात. पण कधी कधी आणीबाणी येते तेव्हा तुमचे पैसे अडचणीत येऊ शकतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमचे गुंतवलेले पैसे सुरक्षित ठेवायचे असतील, तर तुमच्यासाठी आरोग्य विमा खूप महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा तुम्हाला आरोग्यासाठी पैशांची गरज भासते तेव्हा अचानक ते तुमच्यासाठी उपयोगी पडू शकते.

महागड्या उपचारांपासून दिलासा

आरोग्य विमा तुमच्या महागड्या उपचारांपासून दिलासा देतो. कारण आजच्या काळात डॉक्टरांची फी, औषधे महाग होत आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला उपचारासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. आशंका हाताळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आरोग्य विमा खरेदी करणे. महागाईमुळे दरडोई वैद्यकीय खर्च वाढला आहे.

हॉस्पिटलायझेशन व्यतिरिक्त इतर खर्च

जेव्हा हॉस्पिटलायझेशनचा विचार केला जातो तेव्हा हॉस्पिटलायझेशन शुल्काव्यतिरिक्त, इतर प्रकारचे खर्च असतात. प्री-मेडिकल चेकअपपासून ते डॉक्टरांच्या फी आणि औषधांपर्यंत अनेक खर्च, तुमच्या हॉस्पिटलायझेशन शुल्कापेक्षा जास्त असतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is it important to have health insurance find out ttg