Reasons for a Late Period : मासिक पाळी हा महिलांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. दर महिन्याला महिलान चुकता मासिक पाळीला सामोरे जातात. मासिक पाळी संदर्भात अनेक महिलांना अनेक प्रश्न असतात. काही प्रश्नांची उत्तरे त्यांना शोधूनही सापडत नाही. मासिक पाळीची संबंधीत अनेक समस्या त्यांना जाणवतात. कधी पाळी दरम्यान असहनीय त्रास होतो तर कधी मासिक पाळी उशीरा येते. तुम्हाला पण मासिक पाळी उशीरा येते का? जर हो, तर मासिक पाळी उशीरा का येत असावी? याचा कधी तुम्ही विचार केला का? आज आपण या विषयीच सविस्तर जाणून घेऊ या. मासिक पाळी उशीरा येण्यामागे कोणती कारणे असू शकतात, याविषयी माहिती देणारा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये डॉ. स्मिता भोइर यांनी मासिक पाळी उशीरा येण्याची काही कारणे सांगितली आहेत. त्यांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला कदाचित समजून घेता येईल की तुमची मासिक पाळी उशीरा येण्यामागे नेमके कारणे कोणते?
डॉ. भोइर यांनी या व्हायरल व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे मासिक पाळी उशीरा येण्यामागे ही कारणे असू शकतात.
१. पिसीओडीचा आजार
२. मानसिक तणाव
३. अनेमिया हा आजार
४. थायरॉइडचे आजार
५. अपुरी झोप
६. काटेकोटपणे डाएटींग
७. औषधांचे दुष्परिणाम
या वरील कारणांमुळे तुमची मासिक पाळी उशीरा येऊ शकते. अशावेळी जवळच्या डॉक्टरांना किंवा तज्ज्ञांना संपर्क साधावा आणि त्यावर उपचार घ्यावे.
हेही वाचा : Video : मेकअप करता येत नाही? फक्त या १० स्टेप्सच्या मदतीने शिका परफेक्ट मेकअप
peachtree_marathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुमची ही मासिक पाळी उशीरा होते का?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने विचारलेय, “ताई पाळी पुढे जाण्याची गोळी घेतली तर काय प्रॉब्लेम नाही होत ना,मी कधी घेत नाही,आता स्वामी च पारायण आहे, म्हणून घ्यायची आहे” तर एका युजरने लिहिलेय, “तुम्ही खूप छान व्हिडीओ बनवता. समजतात पण लगेच. खूप धन्यवाद.” आणखी एका युजरने विचारलेय, “मासिक पाळी उशीरा येत असेल तर काय उपाय आहेत”