साबण ही रोजच्या वापरातील घरोघरी वापरली जाणारी वस्तू आहे. पूर्वी साबण हा गरजेपुरता आणि विशिष्ठ प्रकारात मर्यादीत होता मात्र आता साबणामध्ये अनेक प्रकार आले आहेत. सुगंधी साबण, वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेवरमध्येही साबण आज उपल्बध आहेत. तसेच त्यांना मागणीही त्याप्रमाणे आहे. काही साबण असतात ते अगदी अत्तरासारखे काम करतात तर काही साबणाचा प्रचंड फेस होतो. प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार हे साबण निवडतो. आता अनेक पर्याय उपल्बध असले तरी एकेकाळी लाईफबॉय नावाच्या साबणानं स्वत: चं वेगळं स्थान साबणांच्या स्पर्धेत निर्माण केलं होतं. पूर्वी लाईफबॉय आवडतो असं म्हणण्यापेक्षा त्याच्याशिवाय दुसरा साबण असतो हे अनेकांना माहीतच नव्हतं.

‘लाईफबॉय हैं जहाँ तंदुरुस्ती हैं वहा…’, ‘तंदुरुस्ती की रक्षा करता हैं लाईफबॉय’, ‘बंटी तुझा साबण स्लो आहे का?’ यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आम्ही कशाबद्दल बोलतोय. तर आजचा किस्सा आहे लाईफबॉय साबणाचा. चला तर मग जाणून घेऊयात अशा या सुप्रसिद्ध लाईफबॉय साबणाची कहाणी…

shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
do really Nagpur is better than Mumbai
Video : खरं मुंबईपेक्षा नागपूर चांगलं आहे का? राजधानी व उपराजधानी, कोणते शहर उत्तम? नेटकरी स्पष्टच बोलले…
When Is Bhogi Celebrated in 2025
भोगीचा सण केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर…
Special Makar Sankranti Ukhane in Marathi
Makar Sankranti Ukhane : महिलांनो, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात घ्या एकापेक्षा एक हटके उखाणे, एकदा लिस्ट पाहाच
Excessive use of chemical fertilizers disrupts the natural chain says MLA Arun Lad
रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे निसर्ग साखळी विस्कळीत – आमदार अरूण लाड
committee has been formed under chairmanship of sub-divisional officer of Daryapur to investigate after Kirit Somaiyas allegations
किरिट सोमय्यांच्‍या आरोपानंतर खळबळ… अमरावतीत आता बांगलादेशींच्या…
Anand Mahindra reacts to parent hack video
Anand Mahindra: अहो, थांबा! परदेशी नागरिकाचा ‘जुगाड’ पाहून आनंद महिंद्रा झाले थक्क; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाले, ‘आमचा मुकुट…’

कसा झाला लाईफबॉय साबणाचा जन्म

आता जाणून घेऊयात, या लाईफबॉय साबणाचा जन्म नेमका कसा झाला. विल्यम आणि जेम्स या लिव्हर बंधूंनी १८८५ साली इंग्लंडमध्ये साबणाची एक छोटीशी फॅक्टरी सुरू केली. हे दोघे भाऊ त्यावेळी व्हेजिटेबल आणि पामतेलापासून साबण बनवायचे. या दोघांनी तयार केलेला सनलाईट हा त्यांचा पहिला वहिला साबणही खूप गाजला होता. यामुळे त्यांचा व्यवसायही हळूहळू वाढत होता. लिव्हरबंधूंची ही साबण फॅक्टरी म्हणजे लिव्हरपूल भागातील पोर्ट सनलाईटमध्ये वसलेलं एक गावच होतं. साबण बनवण्यासाठी अनेक प्रयोग केले. १८९४-९५ च्या दरम्यान या दोघा भावांनी पहिल्यांदाच काबरेलिक अ‍ॅसिड वापरून बनवलेला साबण म्हणजे आपला लाईफबॉय.या साबणाच्या रंगाबद्दलही अनेकांना उत्सुकता होती. चला तर जाणून घेऊयात याचा रंग कसा तयार केला. काबरेलिक अ‍ॅसिडच्या वापरामुळे त्याचा लाल रंग आणि औषधासारखा गंध हे समीकरण पक्के झाले. त्या काळात काबरेलिक ॲसिडचा वापर फक्त मेडिकलच्या क्षेत्रात होत असल्याने साबणात त्याचा वापर अनोखा ठरला. १९११ पर्यंत लाईफबॉय अमेरिका, जर्मनी, स्वित्झर्लंड, कॅनडापर्यंत पसरला. आजच्या तारखेला पाहिलं तर भारत सोडून बाकी देशात बऱ्यापैकी लाईफबॉय साबणाची लाईफ संपल्यात जमा आहे. तर भारतातील ग्रामीण भागात अजूनही या साबणाशिवाय अंघोळ होत नाही.

रश्मी वारंग यांनी ब्रँडनामा सदरात लाईफबॉयविषयी लिहिलं होतं >>

जाहिरातीनं केली खरी जनजागृती

आपल्याला सगळ्यांना माहितीये हे जाहिरातीचं जग आहे. मात्र जेव्हा जाहिरातींचं प्रमाण कमी होतं त्यावेळी जाहिरातीचा सगळ्यात उत्तम वापर लाईफबॉयनेच केला असं म्हणावं लागेल. त्यांनी लोकांच्या मनाचा अभ्यास केला असं म्हणायला हरकत नाही. कारण ते म्हणजे, डॉक्टरांकडे जाण्यापासून वाचायचं असेल तर तुम्हाला लाईफबॉय साबण वापरावाचं लागेल, अशा प्रकारातून लिव्हर ब्रदर्सने प्रमोशन करायला सुरुवात केली. लोकं भीतीने आणि जागृतीसाठी का होईना, हे साबण घेऊ लागले. किटाणू आणि रोगांपासून रक्षण करण्यासाठी उपाय म्हणजे केवळ लाईफबॉय अशा त्यांच्या या जाहिरातीने लाईफबॉय मार्केटमध्ये वजन निर्माण करू पाहत होते. १९३३ मध्ये लाईफबॉय भारतात आला आणि भारतातला जवळपास ६७% नफा कमावू लागला. टीव्हीमध्ये जाहिरात होती की, ‘लाईफबॉय हैं जहाँ तंदुरुस्ती हैं वहा…’, १९३२ ते १९४८ या काळात लाईफबॉयने ६० देशांसोबत आपला व्यापार जोडला होता. या साबणात तुम्हाला वेगवेगळे प्रकारही उपलब्ध आहेत. हा सात साबणांचा पॅक आहे. हिंदुस्तान युनिलिवर लिमिटेड कंपनीने याबाबत माहिती दिली आहे.

कोणत्या देशात बंदी

अशी अनेक उत्पादनं भारतात विकली जातात, ज्यावर जगातील इतर देशांमध्ये बंदी आहे. त्यातीलच एक साबण ज्याने भारतात प्रचंड विक्री केली. आजही त्याची भरतातील विक्री थांबली नाहीये, मात्र याच साबणाच्या वापरावर अमेरिकेत बंदी आणली आहे. लाईफबॉय साबण २००६ सालापासून अमेरिकेतून गायब होऊ लागला. मानवी त्वचेसाठी हा साबण धोकादायक असल्याचं अमेरिकेत बोललं जाऊ लागलं, त्यामुळे लोकांनी लाईफबॉय घेणेच बंद केलं. याचे कारण म्हणजे, हा साबण आपल्या त्वचेवर गंभीर परिणाम करत आहे. भारतातील ग्रामीण भागात मात्र या साबणाची डिमांड आजही तशीच आहे, जशी अगोदर होती. फक्त एवढच की शहरांमध्ये लोकांना अनेक पर्याय उपलब्ध झाल्यामुळे आता लाईफबॉय साबणाची मागणी शहरी भागात कमी झालीय.

हेही वाचा >> Flamingo City: नवी मुंबई फ्लेंमिंगो सिटी होतेय पण त्यामागचं कटू वास्तव माहितीये का?

बदलत्या काळात साबणाला हजार पर्याय निर्माण झाले. मात्र आजही ग्रामीण भागात महिन्याच्या बाजाराच्या यादीत लाईफबॉय साबणाचं नाव पाहायला मिळतं.

हा झाला लाइफबॉय साबणाचा प्रवास; पण तुम्हाला माहीत आहे का? साबण हा शब्द मराठी भाषेतला नाही. हा शब्द मराठी भाषेत कुठून आला? साबण या शब्दासाठी वापरण्यात आलेला मूळ शब्द काय होता? हे आपण जाणून घेऊ.

साबण या शब्दाचा इतिहास काय आहे?

साबण हा मराठी शब्द नाही. जुन्या लॅटिन भाषेतील ‘सॅपॉ’चं ते मराठी रुप आहे. लॅटिन भाषेतला ‘सॅपोनेम’ पोर्तुगीज भाषेत ‘सॉबओ’ झाला, तर ग्रीक भाषेत त्याचा उच्चार झाला ‘सॅपौनी.’ फ्रेंच लोक त्याला सॅव्हॉन म्हणू लागले. इंग्रजीत त्याला ‘सोप’ म्हणतात. बंगालीत ‘साबन’ म्हणू लागले. त्यानंतर हिंदीत त्याला ‘साबुन’ असं म्हटलं जातं. हा शब्द मराठीत आला तेव्हा त्याचा शब्द झाला ‘साबण.’ लॅटिन भाषेतला ‘सॅपॉ’ असा प्रवास करत मराठीत आला तेव्हा त्याचा ‘साबण’ झाला. सतराव्या शतकात इंग्लंडने साबणावर करही लावला होता. साबण हा श्रीमंतांच्या चैनीची गोष्ट आहे असं त्यांनी म्हटलं होतं. नंतर हा कर हटवला गेला. त्यानंतर साबण हा सामान्यांच्या हाती आला. सदानंद कदम यांनी कहाणी शब्दांच्या पुस्तकात साबणाच्या नावामागची गोष्ट उलगडली आहे.

Story img Loader