Why Nath/Nose Pin Is Wore On Left Nostril: नाकात नथ आणि कपाळाला टिकली या भारतीय स्त्रीच्या पारंपरिक रूपाची भुरळ साऱ्या विश्वाला पडली आहे. अनेक परदेशी महिला सुद्धा या रूपात सोशल मीडियावर पाहायला मिळतात. कितीही पाश्चिमात्य कपड्यांचा ट्रेंड आला तरी नथीने येणारा क्लासिक लुक कधीक कालबाह्य होणार नाही. मागील कित्येक वर्षात नथींच्या अनेक डिझाईन बाजारात आल्या. अलीकडे मोत्याच्याच नव्हे तर ऑक्सिडाइज किंवा चांदीच्या नथी किंवा नोजपिन सुद्धा वापरल्या जातात. काही भागात नोज पिन ही दोन्ही नाकपुड्यांवर तर काही ठिकाणी नाकाच्या मधील हाडावर सुद्धा घातली जाते पण तुम्हाला माहित आहे का तुमच्या डाव्या नाकपुडीवर नथ घातल्यास केवळ रूपातच नाहीतर आरोग्यातही मोठे बदल दिसून येऊ शकतात.
सोशल मीडियावर आयुर्वेद अभ्यासक @शुभांगी चौहान या अकाउंटवर नथ नेहमी डाव्याच नाकपुडीवर का घातली पाहिजे याची माहिती दिलेली आहे. डाव्या नाकपुडीवर टोचल्याने शरीराला होणारे भन्नाट फायदे वाचून आपणही थक्क व्हाल. चला तर पाहुया…
१) आयुर्वेदानुसार नाकपुडी उघडण्याच्या जवळ मज्जातंतूंचे पुंजके असतात जेव्हा नाकाच्या डाव्या बाजूला छिद्र केले जाते तेव्हा या मज्जातंतू उत्तेजित होतात.
२) गर्भाशयाला निरोगी बनवण्यात मदत होते
३) मासिक पाळीच्या वेदना आणि प्रसूती वेदना देखील कमी करण्यात मदत होते.
४) आपल्या शरीरात काही ऍक्युप्रेशर पॉईंट असतात, यापैकी डाव्या नाकावरील पॉईंट हा थेट प्रजनन प्रणालीशी जोडलेला असतो.
५) डावी नाकपुडी टोचल्याने शरीरातील स्त्रीत्व खुलून येऊ शकते.
दरम्यान, दाक्षिणात्य राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी उजव्या नाकपुडीवर टोचण्याची पद्धत आहे. मात्र महाराष्ट्रात विशेषतः पारंपरिक मराठी साजातील नथ ही दाव्याचा बाजूने घातली जाते.
हे ही वाचा << एका नजरेत गोड कलिंगड कसे ओळखाल? न कापता, न चाखता भेसळीची ‘ही’ सहा चिन्हे आधी ओळखा
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)