Marriage and Weight Gain: तुम्ही वजन वाढवण्यासाठी लग्न करता का? हे विचित्र वाटत असले तरी ते खरे असण्याची शक्यता आहे. पोलंडमधील वॉर्सा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजीच्या एका टीमने केलेल्या अभ्यासात, लग्न आणि वजन वाढण्याचा एकमेकांशी संबंध असल्याचे दिसून आले आहे. या संशोधकांनी असे निरीक्षण नोंदवले आहे की, लग्नानंतर लोकांचे वजन वाढू शकते आणि ते लठ्ठ होऊ शकतात. आज आपण लग्न आणि लठ्ठपणाचा काय संबंध आहे, याविषयी जाणून घेणार आहोत.
निष्कर्ष-
लग्न आणि लठ्ठपणाचा काय संबंध?
हा अभ्यास २,४०५ लोकांवर करण्यात आला, ज्यामध्ये अंदाजे अर्ध्या महिला, अर्ध्या पुरुषांचा समावेश होता. या लोकांचे सरासरी वय ५० वर्षं होते. या २,४०५ लोकांपैकी ३५.३ टक्के लोकांचे वजन सामान्य होते; तर ३८.३ टक्के लोकांचे वजन कमी होते आणि २६.४ टक्के लोक लठ्ठ होते.
या अभ्यासात असे आढळून आले की, लग्नानंतर पुरुषांमध्ये लठ्ठपणाचा धोका तिप्पट वाढतो. पुरुषांना वजन वाढण्याचा धोका ६२ टक्के; तर महिलांना वजन वाढण्याचा धोका ३९ टक्के असतो.
लग्नानंतर वजन का वाढते?
इकॉनॉमिक्स अँड ह्युमन बायोलॉजी या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात लग्नानंतर पहिल्या पाच वर्षांत विवाहित पुरुषांच्या ‘बॉडी मास इंडेक्स’शी लग्नाचा थेट संबंध असल्याचे आढळून आले. ‘बॉडी मास इंडेक्स’ म्हणजे उंची आणि वजनावरून शरीरातील फॅट मोजण्याचा मार्ग आहे. अभ्यासात याविषयी स्पष्टीकरण देताना, पुरुषांमध्ये लग्नानंतर जास्त खाण्याची आणि कमी व्यायाम करण्याची प्रवृत्ती हे वजन वाढण्याचे कारण दिले आहे.
एका जुन्या संशोधनात याला ‘हॅपी फॅट’ असा उल्लेख केला होता, जिथे त्यांनी वजन वाढणे आणि लैंगिक संबंधाला एकमेकांशी जोडले. त्यांना विवाहित पुरुष आणि अविवाहित पुरुषांमध्ये बॉडी मास इंडेक्समध्ये खूप जास्त फरक जाणवला.
वजन वाढण्याचा लग्नाशी थेट संबंध असला तरी या अभ्यासात निरीक्षणातून दिसून आले की, लग्नाच्या प्रत्येक वर्षाला, दोन्ही पुरुष आणि स्त्रियांचे वजन कसे वाढते? अभ्यासात असे सांगण्यात आले, “पुरुष असो किंवा; स्त्री वय आणि वैवाहिक स्थितीचा वजनावर परिणाम होतो.”