अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की लग्नसमारंभात सर्वत्र गुलाबाच्या फुलांनी डेकोरेशन केलेलं असतं. इतकंच नव्हे तर हनिमूनच्या दिवशी सुद्धा जोडप्याची खोली गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवली जाते. यामागे अनेक कारणे आहेत. सुगंधाचा आपल्या मूडशी खूप जवळचा संबंध आहे. खरं तर, गुलाब हे जगभर प्रेमाचे प्रतीक मानलं जातं. तसंच ते शरीरातील नैसर्गिक कामवासना वाढवणारे आहे. याशिवायही इतर अनेक कारणे आहेत. चला तर मग आज व्हॅलेंटाईन वीकच्या सुरुवातीला याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेंदूवर सुगंधाचा होतो परिणाम
आयुर्वेदानुसार गुलाब हे नॅचरल ऐफ्रोडिसिऐक आहे. त्याची पाकळ्या शरीरातील दोष दूर करतात. यामुळे, एखाद्या व्यक्तीला सेक्शुअली अॅक्टिव देखील वाटतं. आयुर्वेदामध्ये लैंगिक जीवन सुधारण्यासाठी, गुलाबाच्या पाकळ्या धुवून खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, सुगंधाचा परिणाम तुमच्या मेंदूवरही होतो. त्यामुळे तुमचा मूड चांगला राहतो.

आणखी वाचा : काय सांगता! केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, दुहेरी बोनान्झा मिळणार! पगारवाढीसोबतच या मोठ्या घोषणा

गुलाबामुळे ताण कमी होतो
गुलाबपाणी हे अँटी-डिप्रेसंट मानले जाते. २०११ च्या अभ्यासात असं दिसून आलं की, गुलाबाच्या पाकळ्यांमुळे उंदरांची मध्यवर्ती मज्जासंस्था शिथिल होते. यामुळे तणावही कमी होतो. म्हणजेच तुमचा मूड चांगला नसेल, तणाव असेल तर तुम्ही गुलाब जवळ ठेवून गुलाबाचा वास घेऊ शकता. यामुळे तुमचा मूड त्वरित सुधारेल.

आणखी वाचा : UIDAI ने घेतला हा मोठा निर्णय, करोडो आधार कार्डधारकांना होणार फायदा, जाणून घ्या सविस्तर

गुलाबाचे हे फायदे मिळतील
याशिवाय गुलाबाचा वापर अनेक प्रकारे केला जातो. ब्युटी प्रोडक्ट म्हणून गुलाबपाणीचा वापर फार पूर्वीपासून होत आहे. चंदनाच्या मास्कमध्ये गुलाबपाणी टाकल्याने त्वचेवरील सनबर्न बरे होण्यास मदत होते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why room decorated with roses on the honeymoon know on rose day prp