हिंदू धर्मात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. हे चार महिने देवाधिदेव श्रीशंकर सृष्टीचे पालक बनतात, अशी धार्मिक मान्यता आहे. आषाढनंतर येतो श्रावण मास, हा महिना महादेवाला समर्पित मानला जातो. खरे तर हिंदू धर्मात पूर्ण चार महिने म्हणजेच चातुर्मास पाळण्याची पद्धत आहे, परंतु कालौघात केवळ श्रावणालाच महत्त्व उरले आहे. विशेष म्हणजे श्रावण महिना सुरु झाला की, मांसाहार पूर्णपणे टाळला जातो. या काळात सणवार येत असल्यामुळे साधारणपणे मांसाहार केला जात नाही असं म्हटलं जातं. परंतु, सणसमारंभांसोबतच श्रावणात मांसाहार न करण्यामागे काही वैज्ञानिक कारणंदेखील आहेत. त्यामुळे ती कारणं कोणती ते पाहुयात..

श्रावणात नॉनव्हेज का खात नाहीत? 

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
prohibited tobacco products seized, Mhatrenagar in Dombivli, Dombivli, tobacco,
डोंबिवलीत म्हात्रेनगरमध्ये प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh Diet
Rakul Preet Singh Diet : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; रकुलने सांगितले डाएटचे सीक्रेट, वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”

आधी म्हटल्याप्रमाणे हे दिवस पावसाळ्याचे आहेत. वातावरण दमट असते आणि विषाणूंची वाढ या दिवसात खूप होते, त्यातल्या त्यात मृत जीवांवर जास्त होते. मांसाहार करायचा म्हटले की ते कापण्यापासून करून खाण्यापर्यंत बराच वेळ असतो. पण यात जास्त वेळ लागला तर विषाणू वाढू शकतात आणि त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. या दिवसात आपण शिळे अन्नसुद्धा खाल्लं नाही पाहिजे.

श्रावण महिना हा खासकरुन प्राण्यांच्या प्रजननाचा काळ मानला जातो. या कालात मासे व अन्य प्राण्यांची गर्भधारणा होत असते. त्यामुळे या प्रजनन काळात मासेमारी सातत्याने होत राहिली. तर माशांच्या प्रजाती धोक्यात येऊ शकतात. माशांचं प्रजनन झालं नाही तर त्याच्या प्रजाती नष्ट होऊ शकतात. त्यामुळे या काळात मासे किंवा अन्य नॉनव्हेज खाण्यास मनाई केली जाते.

शक्यतो नॉनव्हेज पदार्थ टाळावेत

वातावरणातील बदलाचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होत असतो. त्यातच पावसाळ्यात आपली पचनशक्ती थोडी मंदावली असते. त्यातच मांस, मटन, मासे हे पदार्थ खाल्ल्यावर ते पचायला जड जातात. म्हणूनच, श्रावणात व खासकरुन पावसाळ्यात शक्यतो नॉनव्हेज पदार्थ टाळावेत.

हेही वाचा – Pedicure At Home: पार्लरसारखं पेडिक्युअर करा फक्त १० रुपयांत, घर बसल्या पाय सुंदर आणि मऊ बनवा

काय आहे वैज्ञानिक कारण?

श्रावणात ऊन, पावसाचा खेळ सुरू असतो. त्यामुळे या काळात रोगराई वाढण्याची, बुरशी आणि विषाणूंचे संक्रमणाचे प्रमाण वाढलेले असते.

अन्न पदार्थ लवकर खराब होतात.

हे दुषित संक्रमण मांसाहारवर लवकर होण्याची शक्यता जास्त असते. असे पदार्थ खाणे आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक असते.