Buttermilk benefits in Summer : उन्हाळ्यात शरीराला पाण्याची सर्वात जास्त आवश्यकता असते. उष्णतेमुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवते आणि शरीर थकलेले असते. जेव्हा तुम्हाला घाम येतो, तेव्हा आपले हात थंड पाण्याच्या बाटलीकडे जातात. अशावेळी पाण्याबरोबर तुम्ही एक ग्लास ताक सुद्धा पिऊ शकता. ताक हे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते आणि तुम्हाला ताजेतवाने ठेवू शकते. ताकाच्या सेवनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

डिहायड्रेशन दूर करते.

अति उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते अशा परिस्थितीत शरीर हायड्रेटेड ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्हाला डिहायड्रेशन होत असेल तर उन्हाळ्याच्या दिवसात एक ग्लास ताक तुम्हाला ऊर्जा देऊ शकते आणि तुमचा थकवा दूर करू शकते.

शरीर थंड ठेवते

थंड द्रव पदार्थ प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी ताक हा एक उत्तम पर्याय आहे. ताकामध्ये शरीराला थंडावा देणारे गुणधर्म आहे जे शरीराचे तापमान कमी करू शकतात. मेनोपॉज आलेल्या महिलांसाठी ताक हे अतिशय फायदेशीर आहे.

बद्धकोष्ठता दूर करते

दररोज सकाळी उपाशी पोटी ताक प्यायल्याने बद्धकोष्ठता दूर होते आणि पोटाचे आजार सुद्धा दूर होतात. पोट फुगण्याचा त्रास कमी होतो.

आतड्यांचे आरोग्य चांगले राहते

दह्यामध्ये चांगले प्रोबायोटिक गुणधर्म आहेत आणि ताक हे दह्यापासून बनवले जाते जे पचनक्रियेत चांगले बॅक्टेरिया वाढवण्याचे काम करते. निरोगी पचनसंस्थमुळे रोगप्रतिकारक शक्ती आणि व्यक्तीच्या एकूण आरोग्य उत्तम राहते.

​​वजन कमी करण्यास मदत करते

अनेक जण वजन कमी करताना दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे टाळतात. ताकात फॅटशिवाय दुधात असलेले सर्व पोषक घटक असतात. एक ग्लास ताकामुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटेल. जर तुमचे ध्येय कॅलरीज कमी करायचे असेल तर ताक हे एक उत्तम पेय आहे.
बनते.

निरोगी त्वचा

ताकामध्ये अल्फा हायड्रॉलिक अॅसिड आणि लॅक्टिक अॅसिड असते जे तुमच्या त्वचेला उन्हापासून संरक्षण देते. उष्णतेमुळे तुमची त्वचा निस्तेज व तेलकट होऊ शकते पण एक ग्लास थंडगार ताक तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतो.