Why Should We Drink More Water In Winter : जसजशी थंडी वाढू लागते तसतसे आपल्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण सगळेच विसरून जातो, ते म्हणजे ‘हायड्रेटेड राहणे’ (Water Intake In Winter Season). हिवाळ्यात आपल्याला तहान लागत नसली तरी दिवसभर शरीर कार्यरत ठेवण्यासाठी पुरेसे द्रव पिणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे ‘फास्ट अँड अप’ येथील स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट अपूर्वा यू. सुर्वे (Apurva U. Surve) यांनी सांगितले.

तुम्ही पुढील काही टिप्सची मदत घेऊन शरीर हायड्रेट ठेवू शकता (Water Intake In Winter Season)…

फ्लेवर्ड वॉटर : हिवाळ्यात साधे पाणी (Water) आवडत नसेल तर पाणी चवदार बनवण्यासाठी त्यात आल्याचे तुकडे, दालचिनी किंवा फळांचे तुकडे घालण्याचा प्रयत्न करा. या फ्लेवर्समुळे तुमचे पाणी केवळ चवदार बनत नाही, तर ते सुधारित पचन, सुधारित इन्सुलिन संवेदनशीलता आणि मजबूत प्रतिकारशक्ती यांसारखे आरोग्य फायदेदेखील देतात.

सूप किंवा मटणाचा रस्सा : सूप आणि मटणाचा रस्सा हिवाळ्यातील आरामदायी पदार्थ आहेत, जे तुम्हाला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. पारंपरिक भारतीय पदार्थ सूप जसे की रस्सम, शोरमा सारख्या मसालेदार मटणाचा रस्सा केवळ चविष्टच नाही तर सर्दी आणि खोकला कमी करण्यासदेखील मदत करतात.

हर्बल टी : थंडीच्या दिवसांसाठी हर्बल टी हे योग्य पेय आहे! कॅमोमाइल किंवा पेपरमिंटची निवड करा किंवा काहवा (मसालेदार काश्मिरी चहा) किंवा आले-वेलची चहा यांसारख्या काही भारतीय पदार्थांचा वापर करा.

दिनचर्येत इलेक्ट्रोलाइट्सचा (Electrolytes ) समावेश करा : हिवाळ्यात कमी तहान लागणे सामान्य आहे, ज्यामुळे पाण्याचे सेवन अगदीच कमी केले जाते. तेव्हा तुमच्या हायड्रेशन रुटीनमध्ये इलेक्ट्रोलाइट्स जोडल्याने शरीराला द्रव संतुलन राखण्यास मदत होते आणि आवश्यक खनिजे शरीरात पुन्हा जातील याची खात्री होते. यासाठी इलेक्ट्रोलाइट टॅब्लेट एक उत्तम पर्याय आहे, कारण हे पाण्यात लवकर विरघळतात, ज्यामुळे थंडीच्या महिन्यांत हायड्रेटेड राहणे सोपे जाते.

आतड्याच्या आरोग्यासाठी प्रोबायोटिक ड्रिंक्स : प्रोबायोटिक ड्रिंक्स हे हायड्रेट करण्याचा आणि त्याच वेळी तुमच्या पचनाला पाठिंबा देण्याचा उत्तम मार्ग आहे. हिवाळ्यात तुम्ही छास (मसालेदार ताक) किंवा कांजी (आंबवलेले काळे गाजर पेय) चे सेवन करू शकता.

दूध : जर तुम्ही दूध पिण्यास प्राधान्य देत असाल तर हळदीचे दूध किंवा बदाम दूध (केसर असलेले बदाम दूध) सारखे पर्याय तुमच्यासाठी योग्य आहेत. तर हळदीच्या दुधात एक चिमूटभर काळी मिरी घालायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या शरीराला हळदीमध्ये आढळणारे बायोॲक्टिव्ह कर्क्यूमिन शोषून घेता येईल, जे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला समर्थन देते.

तुमच्याकडे नेहमी उष्णतारोधक पाण्याची बाटली उपलब्ध असल्याची खात्री करा, जी तुमचे पाणी योग्य तापमानात ठेवण्यास मदत करू शकते. कारण वर्षभर हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे आहे. तर या टिप्स तुम्हाला हिवाळ्यात उबदार आणि हायड्रेटेड राहण्यास मदत करतील आणि शरीराला पुरेसे द्रव मिळत राहील (Water Intake In Winter Season).

Story img Loader