Bra While Sleeping : ब्रा ही महिलांच्या कपड्यांधील महत्त्वाचे अंतर्वस्त्र मानले जाते. ब्रा संदर्भात महिलांना अनेक प्रश्न पडतात. त्यातलाच महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रात्री झोपताना ब्रा घालून झोपावे की नाही, याविषयी अनेकदा महिलांमध्ये संभ्रम सुद्धा पाहायला मिळतो. काही महिलांना ब्रा घालून झोपणे अवघड जाते तर काहींना ब्रा घालून झोपणे अधिक सोयीस्कर वाटते. टाईम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तात सांगितल्याप्रमाणे, काही संशोधनानुसार ब्रा घालुन झोपल्यामुळे स्तनाचा कॅन्सर होऊ शकतो. चला तर जाणून घेऊ या, ब्रा घालून झोपल्यामुळे कोणते दुष्परिणाम दिसून येतात?
रक्त प्रवाहावर परिणाम दिसून येतो
ब्रा विशेषत: अंडरवायरमुळे रक्तभिसरणावर याचा परिणाम होऊ शकतो.याशिवाय अंडरवायरचा स्तनाच्या जवळपासच्या स्नायुंवर याचा परिणाम दिसून येतो. ज्या ब्रा खूप जास्त घट्ट असतात त्यामुळे स्तनाच्या ऊतींना त्रास होऊ शकतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी ब्रा काढून झोपावे.
त्वचेला खाज सुटू शकते
जर तुम्ही ब्रा घालून झोपत असाल तर त्यामुळे ब्रा चे हूक्स आणि बटनचा तुम्हाला त्रास होण्याची जास्त शक्यता असते. ज्यामुळे तु्मच्या त्वचेला त्रास होऊ शकतो.
फंगल इन्फेक्शन (बुरशीजन्य संसर्ग) होऊ शकतो
ब्रा घालून झोपल्यामुळे बुरशीजन्य संसर्ग होण्याची भीती असते. कारण जास्त वेळ ब्रा घातल्यामुळे छातीच्या भोवती ओलावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे झोपताना ब्रा घालणे टाळा आणि तुमच्या छातीला मोकळा श्वास घेऊ द्या.
हेही वाचा : चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी तरुणाईने करावा आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
अस्वस्थता जाणवणे
अनेकदा महिलांना ब्रा घालून झोपल्यानंतर अस्वस्थता जाणवते. ज्यामुळे नीट झोपता येत नाही.
त्वचेवर पुरळ येणे
ब्रा या सहसा खूप व्यवस्थित फिट असतात. त्यामुळे जास्त वेळ या घालून राहल्यामुळे तुमच्या त्वचेचा रंग बदलू शकतो, काळे डाग पडू शकतात आणि त्वचेवर पुरळ देखील येऊ शकते.
हे वरील परिणाम लक्षात घेऊन झोपण्यापूर्वी ब्रा काढणे गरजेचे आहे.स्तनाचा आकार बदलू नये म्हणून महिला ब्रा घालतात पण यासाठी अनेक पर्याय आहे. जसे की व्यायाम करणे, मसाज थेरपी इत्यादी.