उन्हाळ्यात होणारी गरमी भरपूर त्रास देते. त्यामुळे कधी एकदा हिवाळा येतो याची वाट अनेकजण पाहत असतात. मात्र, हिवाळ्यात काही लोकांनां थंडी भरपूर जाणवते. तज्ज्ञांच्या मते, जीवनशैली, अन्न आणि शरीरातील स्टॅमिना यामुळे काही लोकांना जास्त थंडी जाणवते. मंद गतीने काम करणाऱ्या अवयवांमधून जास्त मेटाबॉलिज्म हिट निर्माण होते, ज्यामुळे अचानक थरकाप होतो. असेही काही लोक आहेत जे हिवाळ्यामधील थंडी पासून वाचण्यासाठी एकावर एक कपडे घालतात. तरीही त्यांना वाजणारी थंडी कमी होत नाही. चला जाणून घेऊया काही लोकांना हिवाळ्यात जास्त थंडी का जाणवते? जास्त सर्दी होण्याची नेमकी कारणे कोणती?

अचानक अंग थरथरण्याची कारणे कोणती आहेत?

वाढत्या थंडीचा परिणाम प्रथम त्वचेवर दिसून येतो आणि अंगात थरकाप सुरू होतो. जेव्हा आपल्या शरीराचे अवयव मंद गतीने काम करतात तेव्हा ते जास्त मेटाबॉलिक उष्णता निर्माण करतात. अंग थरथरण्याचे कारण म्हणजे शरीर बाहेरील तापमानासोबत आतील तापमानाशी समतोल साधत आहे.

mercury in nashik drops 9 4 degrees celsius
नाशिकमध्ये थंडीचे पुनरागमन; पारा ९.४ अंशावर
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Cold weather Thane district, Thane district temperature,
ठाणे जिल्हा पुन्हा गारठला, जिल्ह्यातील तापमान सरासरी १२ अंश सेल्सिअस
Mumbaikars await cold weather
मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा
Maharashtra cold weather, Maharashtra weather,
डिसेंबरमध्ये देशभरात अपेक्षित थंडी नाहीच; जाणून घ्या, थंडी, थंडीच्या लाटांबाबत हवामान विभागाचा अंदाज
The Meteorological Department has predicted rain in Pune city Pune news
थंडी गायब झाली…आता पावसाची शक्यता
Pune temperature, Mahabaleshwar, Lonavala,
महाबळेश्वर, लोणावळ्यापेक्षा पुण्यातील तापमान कमी, असे का झाले?
Maharashtra weather cold, Maharashtra districts cold,
थंडीचा कडाका आणखी वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा इशारा

( हे ही वाचा: फुफ्फुसात पाणी का भरते? जाणून घ्या काय आहे हा आजार? याची लक्षणे आणि उपचार जाणून घ्या)

थंडी कशी वाटते?

थंडी वाढली की शरीराच्या अवयवांवर परिणाम होऊ लागतो. थंडीमुळे हात पाय सुन्न होऊ शकतात. आपल्या त्वचेला सर्वात आधी कमी आणि उच्च तापमानाचा प्रभाव जाणवतो. आपल्या त्वचेखाली असलेल्या थर्मो-रिसेप्टर मज्जातंतू लहरींच्या रूपात मेंदूला थंडीचा संदेश पाठवतात.

त्याची पातळी आणि तीव्रता वेगवेगळ्या लोकांमध्ये भिन्न असते. त्वचेतून निघणाऱ्या लहरी मेंदूच्या हायपोथालेमसमध्ये जातात. हायपोथालेमस शरीराचे आतील तापमान आणि वातावरण संतुलित करण्यास मदत करते. या संतुलित प्रक्रियेमुळे आपल्या शरीरावरील केस उभे राहतात आणि स्नायूंमध्ये कडकपणा जाणवतो.

( हे ही वाचा: मधुमेहामुळे डेंग्यूचा धोका वाढतो का? जाणून घ्या रक्तातील साखरेशी असलेला याचा संबंध)

काही लोकांना खूप थंडी जाणवते याची ‘ही’ आहेत कारणे

  • ज्या लोकांचे वजन त्यांच्या उंचीनुसार कमी असते, त्यांनाही थंडी जास्त वाटते.
  • ज्या लोकांचे थायरॉईड खूप जास्त आहे, त्यांना थंडी जास्त जाणवते.
  • शरीरात लोहाची कमतरता असली तरी थंडी जास्त जाणवते. रक्त शरीराला उबदार ठेवते. अशा लोकांनी लोहाची कमतरता पूर्ण करणारे पदार्थ खावेत.
  • कमी रक्तदाब असलेल्या लोकांना हिवाळ्यात जास्त थंडी जाणवते.
  • ज्या लोकांना पुरेशी झोप मिळत नाही त्यांनाही जास्त थंडी जाणवते.
  • शरीरात पाण्याची कमतरता असली तरी काहींना थंडी जास्त जाणवते.
  • शरीरात व्हिटॅमिन बी सारख्या विशिष्ट जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे शरीरात थंडी जाणवते.

Story img Loader