Walking during pregnancy : गरोदरपणात महिलेला स्वत:ची विशेष काळजी घ्यावी लागते. महिलांनी या दरम्यान सक्रिय राहणे, तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे. व्यायामापासून आहारापर्यंत निरोगी जीवनशैली अंगीकारणे, महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहितीये का, गरोदरपणात चालणे खूप फायदेशीर आहे. सध्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये योग अभ्यासक मृणालिनी यांनी गरोदरपणात चालणे का महत्त्वाचे आहे, याविषयी माहिती सांगितली आहे. आज आपण त्या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. (Why walking is important during pregnancy read amazing benefits of Walking during pregnancy watch video)

या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –

गरोदरपणात चालणे का महत्त्वाचे?

मांड्या व पेल्विक फ्लोअरची लवचिकता वाढते आणि स्नायूंचा ताण कमी होतो.

घोट्या आणि पायांमधील सूज कमी होते

गर्भधारणेदरम्यान वाढणारे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी कार्य सुधारण्यास मदत होते.

तणाव कमी होऊन मूड फ्रेश होतो.

हेही वाचा : अभिनेत्री पूजा भट्टप्रमाणे तुम्हालाही दारूचं व्यसन सोडवायचंय? डॉक्टरांचे ‘हे’ उपाय करून पाहा, पुन्हा दारूकडे ढुंकूनही बघणार नाही

पाहा व्हायरल व्हिडीओ

yogamarathi_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गर्भधारणेदरम्यान चालणे सुरक्षित आणि गरजेचे मानले जात असले तरी काही काळजी घेणे महत्वाचे आहे.
१. गर्भधारणेदरम्यान कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
२. चालण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतर पुरेसे हायड्रेटेड आहात याची खात्री करा. पाण्याची बाटली सोबत ठेवा.
३. चालताना शरीराचे पोश्चर व्यवस्थित असू द्या.
४. सुरुवातीला कमी अंतर व हळूहळू चालण्यापासून सुरुवात करा आणि हळूहळू तुमचा कालावधी आणि तीव्रता वाढवा.
५. चालताना दम लागणार नाही, श्वास फुलणार नाही याची काळजी घ्या.
६. आरामदायी चप्पल/ शूज निवडा.
७. स्वच्छ वातावरणात व शक्यतो सूर्योदय/ सूर्यास्ताच्या वेळेस फिरायला जा.”

हेही वाचा : How To Clean A Toilet: टॉयलेटची दुर्गंधी झटक्यात होईल दूर! फक्त फ्लश टाकीत टाका ‘या’ दोन वस्तू; बघा स्वस्तात मस्त उपाय

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मी खूप चालते. माझा आता ८ वा महिना चालू आहे आणि मला कसलाच त्रास नाही. मला आशा आहे माझी डिलिव्हरी नॉर्मल होईल” तर एका युजरने विचारलेय, “कोणत्या महिन्यानंतर चालणे ठीक आहे?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Story img Loader