White rice reheating: भारतात जास्तीत जास्त लोक जेवताना भात खातात. अनेकांना तर भात असल्याशिवाय जेवणही जात नाही. भात हा आरोग्यासाठी फार फायदेशीर असतो. आजकाल अनेक वजन वाढण्याची समस्या होते. अशात लोकांना वाटतं की, त्यांनी भात खाल्ला तर वजन वाढतं. पण भात आवडणारे लोक भात खाणं काही सोडत नाहीत. जास्तीत जास्त घरांमध्ये रात्री शिल्लक राहिलेला भात सकाळी गरम करून किंवा त्याला फोडणी देऊन नाश्ता म्हणून खाल्ला जातो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, एकदा शिजवलेल्या भाताला पुन्हा एकापेक्षा जास्त वेळ गरम करणं धोक्याचं ठरू शकतं. पुन्हा गरम केलेला तांदूळ तुमच्या आरोग्याला हाणी पोहचवू शकतो.
गंभीर परिणाम
एकदा शिजवलेले अन्न सतत गरम करून खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. असे केल्याने त्यातील पौष्टीक घटक तर नष्ट होतातच, पण त्याचबरोबर यामुळे त्यात अनेक विषारी घटक वाढू शकतात. अनेकदा आपण शिळा भात पुन्हा गरम करून खातो.आयुर्वेदिक आरोग्य प्रशिक्षक डिंपल जांगडा यांच्या म्हणण्यानुसार, भातामध्ये असलेले हे बॅक्टेरिया खोलीच्या तपमानावर जास्त वेळ शिजवून ठेवल्यास ते लवकर वाढू शकतात. जेव्हा तुम्ही ते पुन्हा गरम करता तेव्हा हे जीवाणू नष्ट होत नाहीत तर वाढतात. तसेच इतर प्रकारचे विष सोडण्यास सुरवात करतात ज्यामुळे अतिसार आणि उलट्या होऊ शकतात.
फूड पॉयझनिंगचा धोका
भात पुन्हा पुन्हा गरम करून खाल्ल्यास फूड पॉयझनिंग होऊ शकते. भातामध्ये बॅसिलस सेरेयस नावाचा बॅक्टेरिया असतो. हा बॅक्टेरिया भात पुन्हा गरम केल्यास नष्ट होत असला तरीही त्याचे अवशेष भातात तसेच राहतात. यामुळे हा भात खाण्यासाठी हानिकारक ठरतो. यातील घटक घटक फूड पॉयझनिंगचे कारण ठरते.पुन्हा पुन्हा गरम केलेला भात खाल्ल्याने तुम्हाला उल्टी, लूज मोशन, पोट दुखणे अशा समस्या होऊ शकतात. त्यामुळे एक्सपर्ट हे तांदूळ शिजवल्यावर एका तासाच्या आत फ्रिजमध्ये ठेवण्याचा सल्ला देतात. कारण त्यात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते.
अशावेळी तांदूळ शिजवल्यानंतर बराच वेळ खोलीच्या तापमानात ठेवून फ्रिजमध्ये न ठेवल्यास हा बॅक्टेरिया खूप वेगाने पसरण्याची शक्यता असते. अशा वेळी बॅक्टेरियासह तांदूळ खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात
भाताचे सेवन करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे भात गरम असताना त्यावर थोडे तूप टाकून खाणे.शिजवलेले तांदूळ रात्रभर फ्रीजमध्ये ठेवू नका याची खात्री करा.