Benifits of eating Garlic: स्वयंपाकाची चव वाढावी, यासाठी फोडणीमध्ये लसणाचाही वापर केला जातो. लसणामुळे अन्नपदार्थ चविष्ट होण्यास मदत मिळते. लसूणमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे आपल्या आरोग्याला भरपूर फायदे मिळतात. यातील पोषक घटकांमुळे कित्येक आजारांपासून आपलं संरक्षण होण्यास मदत मिळते. आयुर्वेदामध्ये लसूण हे एक औषध म्हणून ओळखलं जातं. लसणाचा उग्र वास अनेकांना आवडत नाही. त्यामुळे लसूण खाण्याचे टाळले जाते. पण कमी प्रमाणात का होईना पण आरोग्यासाठी दररोज लसूण खाणे उत्तम असते.
मधुमेहींसाठी ठरतो गुणकारी
नियमितपणे लसूण खाल्ल्याने रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढते. त्यामुळे साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहींनीही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दररोज कच्च्या किंवा भाजीतून व इतर पदार्थांच्या माध्यमातून लसणाचे सेवन अवश्य करावे.
डिप्रेशन होईल दूर
लसूण मेंटल हेल्थसाठी देखील उपयुक्त आहे. लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने आपलं मन संतुलित राहते सोबतच आपल्याला नैराश्याशी लढण्याची ताकद मिळते. तसंच डिप्रेशनमधून सुटका करण्यासाठी अनेकदा लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो.
हेही वाचा – Double Chin: डबल चिन कमी करण्यासाठी ५ सोपे घरगुती उपाय, दूर होईल ही समस्या…
कॅन्सरपासून बचाव
लसणात अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात, त्यामुळे सकाळी काहीही न खाता लसूण चघळल्यास कॅन्सरचा धोका बर्याच प्रमाणात कमी होतो.
वजन नियंत्रणात राहण्यास मदत
तुम्हाला जर तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही दररोज लसूणच्या काही पाकळ्या खाल्ल्या पाहिजेत. कारण लसणात काही असे घटक असतात जे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करते. त्यामुळे दररोज लसूणच्या पाकळ्या खाव्यात.