Skin Care Tips: सुंदर, नितळ त्वचा कोणाला आवडत नाही. जर तुमची त्वचा जन्मत: चांगली नसली म्हणून काय झाले. तुम्ही तुमच्या त्वचेची नीट काळजी घेतली तर तुमची त्वचा ही अगदी छान तजेलदार दिसू शकते. आता थंडीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. हिवाळ्यात कोरड्या त्वचेची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी आपण त्वचेवर मॉइश्चराइझर आणि क्रीम-लोशनचा उपयोग करतो. त्वचेला हायड्रेट ठेवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे मॉइश्चरायझेशन. हिवाळा हा एक ऋतू असल्यामुळे तुमच्या त्वचेला जास्त हायड्रेशनची गरज असते, त्यामुळे तुमच्या त्वचेसाठी योग्य मॉइश्चरायझर वापरणे चांगले. नैसर्गिक मॉइश्चरायझर वापरणे अधिक फायदेशीर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हिवाळ्यात घ्या त्वचेची काळजी

हिवाळ्यामध्ये वाढत्या थंडीमुळे आपली त्वचा कोरडी होऊ लागते आणि त्यामुळे त्वचेमध्ये असलेले तेल कमी होत जाते. त्यामुळे त्वचेवर कोणताही हार्ष साबण वापरल्यावर आपल्या त्वचा अधिक कोरडी होत जाते. त्यामुळे हिवाळ्यात आंघोळ करताना हार्ष साबण वापरू नका. त्याचबरोबर हिवाळ्यात आंघोळीसाठी जास्त गरम पाणी वापरू नका आणि जास्त वेळ पाण्यात राहू नका. हिवाळ्यामध्ये आंघोळ करत असताना शरीराला खूप जास्त घासू नका. आंघोळ झाल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायस ठेवण्यासाठी ओलसर त्वचेवरच मॉइश्चरायझर किंवा तेल लावावे.

हिवाळ्यात सामान्य मॉइश्चरायजर वापरण्याऐवजी ऑइल बेस्ट मॉइश्चरायजर चा वापर करावा. त्वचेला अधिक चांगले बनवण्यासाठी तुम्ही खास रात्री लावण्यासाठी बनवलेले डीप मॉइश्चरायझर देखील वापरू शकता. यामध्ये प्रामुख्याने हात पाय गुडघे चेहरा इत्यादी गोष्टींना मॉइश्चरायज करावे.

(आणखी वाचा : Piles home treatment: मूळव्याधीच्या समस्येवर जादुई ठरेल ‘हा’ उपाय; जाणून घ्या एका क्लिकवर )

सनस्क्रीन वापरा

हिवाळ्यात तुम्ही जेव्हा बाहेर पडाल तेव्हा मॉइश्चरायझर बरोबरच तुमच्या त्वचेला सनस्क्रीन लावायला विसरू नका. सनस्क्रीन तुमच्या त्वचेची अतिरिक्त सूर्य किरणांपासून सुरक्षा करून त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.

हायड्रेटेड रहा

दररोज ७ ते ८ ग्लास पाणी प्या. चांगले आरोग्यदायी ज्यूस प्या. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते. याशिवाय आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळते. यामुळे तुमची त्वचा मुलायम राहते.

मॉइश्चरायझर कधीही लावणे का सोडू नये?

  • मॉइश्चरायझर्स कोलेजनचे उत्पादन उत्तेजित करतात, ज्यामुळे त्वचा मजबूत आणि सुरकुत्या-मुक्त राहते. तज्ञांच्या मते, मॉइश्चरायझर्स त्वचेला मॉइश्चरायझ करतात आणि बारीक रेषा देखील सुधारतात. म्हणून, जर तुम्हाला सुरकुत्या टाळायच्या असतील आणि वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करायची असेल तर तुम्ही नेहमी मॉइश्चरायझर वापरावे.
  • डाग त्वचेच्या सर्वात सामान्य समस्यांपैकी एक आहेत. उन्हाळ्यात, ते आर्द्रतेमुळे दिसतात आणि हिवाळ्यात प्रबळ दिसतात. फक्त विश्वसनीय मॉइश्चरायझर लावून तुम्ही तुमची त्वचा हायड्रेट करू शकता आणि डाग कमी करू शकता.
  • मॉइश्चरायझरचे प्राथमिक कार्य म्हणजे कोरडी आणि चपळ त्वचा रोखणे. हे तुमची त्वचा हायड्रेट करून आणि ओलावा लॉक करून हे साध्य करते. जेव्हा ओलावा बंद होतो, तेव्हा तुमची त्वचा चमकते, तुम्हाला एक तरुण देखावा देते.
  • अभ्यासानुसार, मॉइश्चरायझर्स त्वचेची ऍलर्जी होण्याची शक्यता कमी करतात आणि सोरायसिस आणि एक्जिमा सारख्या त्वचेच्या रोगांवर परिणाम करतात.