Pressure cooker leakage: महिला वर्गाचं स्वयंपाक घरातील kitchen भांड्यांवर विशेष प्रेम असतं. भांडी व्यवस्थित आणि चांगली रहावीत असं प्रत्येकीला वाटतं. जेवण बनविण्यासाठी सर्वात जास्त स्वयंपाकघरात वापर होत असेल तर तो म्हणजे प्रेशर कुकरचा. पण बरेचदा कुकरमध्ये जेवण बनवताना भात अथवा पाणी फसफसून बाहेर येते. यामुळे कुकर खराब व्हायला वेळ लागत नाही. शिवाय हे पाणी इतरत्र पडल्यामुळे किचन देखील खराब होते. तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या टिप्स घेऊन आले आहोत, ज्यामुळे आपण कुकरमधून फसफसून बाहेर येणारे पाणी थांबवू शकतो.
कुकरमधून पाणी का बाहेर येते?
कुकरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक पदार्थ ठेवल्यास पाणी बाहेर येते. त्याचप्रमाणे लहान कुकरसाठी तुम्ही मोठा गॅस बर्नर वापरत असल्यास कुकरमधून पदार्थ बाहेर येतात. घटकांच्या वजनाच्या आधारावर आवश्यक असलेल्या इष्टतम पातळीपेक्षा द्रव जास्त भरल्यास , त्याचा परिणाम झाकणाच्या वरती ओव्हरफ्लो होतो. वाफे तयार होण्यासाठी जागा ठेवणे महत्वाचे आहे. तुम्ही जे अन्न शिजवत आहात त्यावर आधारित, तुमचा प्रेशर कुकर कधीही अर्धा किंवा तीन चतुर्थांशपेक्षा जास्त भरू नका.
(हे ही वाचा : तुमच्या वयानुसार तुम्हांलाwww.loksatta.com/lifestyle/walking-benefits-know-how-many-steps-should-be-taken-daily-according-to-age-heres-what-we-know-pdb-95-3824262/ दिवसभरात किती पावलं चालायला हवं? आजार होतील दूर, ‘हा’ सोपा फिटनेस प्लॅन पाहा )
‘या’ सोप्या टिप्स फाॅलो करा
- जेवण शिजवताना पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यास सीटीसोबत पाणी बाहेर येत. यासाठीच पदार्थामध्ये योग्य प्रमाणात पाणी टाकणं गरजेचं आहे.
- कुकरमध्ये कोणतेही अन्न ठेवण्यापूर्वी त्याचे रबर नक्की तपासा. कुकरच्या रबरला थोडं तेल लावून ती रिंग झाकणात बसवून झाकणं बंद करावं. यामुळे वाफ बाहेर जाणार नाही.
- कुकरचे झाकण बंद केल्यानंतर झाकणावर संपूर्ण बाजूला कणीक लावू शकता. असे केल्यास तुम्ही कुकरमधून पाणी, अन्न बाहेर येण्यापासून रोखू शकता.
- अनेक वेळा कुकरची शिट्टी नीट वापरली जात नाही आणि त्यामुळे अन्न बाहेर येते. त्यामुळे कुकरची शिट्टीही तपासूनच वापरली पाहिजे.
- कुकर जुना झाल्यावर त्यातून पाणी बाहेर येऊ लागते. तेव्हा काही वर्ष एकच कुकर वापरून तो जुना झाल्यावर तो बदलणे नेहमी फायदेशीर ठरते.