सध्या तंत्रज्ञानात रोज नवनवे शोध लागत असून वेगाने प्रगती होताना दिसत आहे. घड्याळ, टीव्हीपासून बऱ्याच गोष्टी स्मार्ट झाल्या आहेत. यासाठी चांगल्या कनेक्टिविटीची गरज आहे. वायफायच्या रेंजला मर्यादा असल्याने मोठं आव्हान होतं. मात्र आता यावरही तोडगा सापडला आहे. वायफायच्या नव्या तंत्रज्ञानामुले आता १ किलोमीटरपर्यंत रेंज मिळेल असा दावा केला जात आहे. या नव्या तंत्रज्ञानाचं Wi-Fi Halow असं नाव आहे.

वायफायचं नवं तंत्रज्ञान काय आहे?
नव्या वायफाय तंत्रज्ञानाला हेलो बोललं जात आहे. या तंत्रज्ञानामुळे इंटरनेट ऑफ थिंग्सवर फोकस करण्यात आला आहे. वायफाय हेलोचा उद्देश औद्योगिक, कृषि, स्मार्ट सिटी अशा ठिकाणी कनेक्टिविटी सक्षम करण्याचा आहे. वायफाय हेलो वायरलेस कनेक्टिविटी आणखी सक्षम करते. तसेच याची रेंज १ किलोमीटरपर्यंत आहे. भिंती आणि अन्य अडचणींवर मात करत चांगली कनेक्टिविटी देण्याचा प्रयत्न आहे. हे तंत्रज्ञान इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) सक्षम उपकरणांसाठी कमी उर्जा, उच्च कार्यक्षमता आणि अधिक सुरक्षित वाय-फाय प्रदान करेल. वाय-फाय तंत्रज्ञान बँडविड्थच्या बाबतीत 2.4Ghz ते 5Ghz स्पेक्ट्रमवर चालते. दुसरीकडे, Wi-Fi Halow 1Ghz पेक्षा कमी स्पेक्ट्रमवर ऑपरेट करण्यासाठी विकसित केले आहे, याचा अर्थ ते कमी उर्जा वापरेल. याव्यतिरिक्त लांब अंतरावर डेटा प्रसारित करण्यास देखील अनुमती देते. स्पेक्ट्रम देखील कमी असल्याने डेटाचा वेग कमी होण्याची अपेक्षा आहे. तथापि, IoT डिव्हाइसेस आणि उत्पादनांना खरोखरच अल्ट्रा-फास्ट वाय-फाय गतीची आवश्यकता नसते आणि ते कमी डेटासह अगदी चांगले कार्य करू शकतात.

व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केल्यानंतर मेसेज कसा पाठवायचा?, ‘हे’ आहेत पर्याय

वाय-फाय हेलो कधी येईल?, याबाबत अद्याप माहिती नाही. मात्र २०२१ च्या चौथ्या तिमाहित डिव्हाइस सर्टिफिकेशन सुरु होण्याची अपेक्षा आहे. म्हणजेच पुढील र्षी वापरासाठी उपलब्ध होऊ शकते.