दूरसंचार कंपन्यांमध्ये सध्या जोरदार स्पर्धा सुरु आहे. इंटरनेटच्या कमी झालेल्या किंमती आणि बाजारात आपला टिकाव लागावा यासाठी कंपन्यांचे सुरु असणारे प्रयत्न यांमध्ये दिवसागणिक भरच पडत आहे. त्यातच जवळपास वर्षभरापूर्वी रिलायन्स जिओने बाजारात दाखल होत स्पर्धक कंपन्यांना चांगलाच दणका दिला होता. पण आता जिओपेक्षाही स्वस्त इंटरनेट देणाऱ्या एका कंपनीने बाजारात पदार्पण केले आहे. ‘वाय-फाय डब्बा’ नावाच्या एका स्थानिक कंपनीने ग्राहकांना आकर्षित करणारी एक ऑफर दिली आहे. ही ऑफर ऐकून तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या कंपनीने २ रुपयांत १०० एमबी डेटा उपलब्ध करुन दिला आहे. तर २० रूपयात १ जीबी डेटा मिळू शकणार आहे. हा प्लॅन केवळ २४ तासासाठी असणार आहे. बंगळुरुमध्ये सध्या ही सेवा उपलब्ध आहे. सध्या एकाच शहरात ही सुविधा सुरु असली तरीही येत्या काही दिवसांतच इतर शहरातही आपली ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

ज्यांना रिचार्ज करायचं असेल त्यांना कंपनीचं डेटा प्रीपेड रिचार्ज कूपन घ्यावं लागेल. हे कूपन बंगळुरुतील छोट्या दुकानांवर सहज उपलब्ध होईल. परंतु या नव्या कंपनीच्या ऑफरमुळे इतर कंपन्यांचे धाबे आणखी दणाणेल अशीही चर्चा आहे. परंतु ग्राहकांसाठी मात्र ही सुविधा अतिशय फायद्याची असेल्याने ते अतिशय कमी किंमतीत इंटरनेट वापरु शकतील. आर्थिक दुर्बल घटकातील लोक तसेच विद्यार्थी वर्गासाठी ही सुविधा फायद्याची ठरेल.