सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी उंची हा अतिशय महत्त्वाचा घटक मानला जातो. अनेकांची उंची कमी असते, अशा लोकांना त्यांच्या कमी उंचीमुळे काही समस्यांना सामोर जावं लागते. कधी प्रवास करताना तर कधी एखाद्या उंच ठीकाणाहून काही वस्तू काढताना या लोकांना, आपली उंची अजून थोडी जास्त असायला हवी होती, असं नेहमी वाटतं. तर कमी उंचीमुळे अनेकांना कॉम्प्लेक्स येतो. पण खरंतर रंग-रुप-उंची या सगळ्या बाह्य गोष्टी आहेत. तरीही अनेकजण या गोष्टींचा न्युनगंड मनात बाळगतात त्यामुळे त्यांचा त्यांच्या कामावर परिणाम होतो. तर अनेकजण आपली उंची वाढवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात.
शिवाय कमी उंचीमुळे आपणाला जो त्रास झाला तो आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये, यासाठी पालक योग्य ती खबरदारी घेतात. पालक आपल्या मुलांना वेगवेगळी सप्लिमेंट खायला सांगतात ज्यामुळे त्यांची उंची वाढेल. तर कमी उंचीच्या मुलांना अनेकजण ‘उंची वाढवण्यासाठी लटकत जा,’ असा सल्लाही देतात. मात्र, लटकल्याने खरच उंची वाढते का ? की फक्त लोक केवळ सल्ला द्यायचा म्हणून देतात, याबाबतची माहीती आपण आज जाणून घेऊया.
हेही वाचा- केळ्यांचा आकार सरळ का नसतो? यामागचे कारण जाणून तुम्हीही व्हाल चकित
लटकल्याने उंची वाढते का?
लटकल्याने उंची वाढतेच असं म्हणणे योग्य ठरणार नाही, हा पण पुल-अप्स मारल्याने थेट उंची वाढवण्यास मदत मिळत नसली तरीही संपूर्ण शरीराची स्थिती सुधारण्यास नक्कीच मदत होऊ शकते. ज्याचा फायदा आपणाला उंच दिसण्यासाठी होतो. जेव्हा मुल लोंबकळतात तेव्हा त्याच्या शरीराच्या वरच्या भागांतील स्नायू जसंकी हात, छाती आणि पाठीचे स्नायू ताणले जातात, ज्यामुळे योग्य पॉश्चर बनण्यासाठी मदत होते.
हेही वाचा- सकाळी उठताच शिंका करतात हैराण? या समस्येपासून बचाव करण्याचे ५ उपाय जाणून घ्या
विज्ञानाच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही व्यक्तीची उंची त्याच्या पालकांच्या आहारावर आणि शरीरातील हार्मोनलच्या बदलांवर अवलंबून असते. परंतु तुम्ही जर व्यायम करताना लटकत असाल तर ते आरोग्यासाठी खूप चांगले आहे. लटकण्याचा सराव केल्याने शरीर लवचिक होते आणि शरीराचा विकासही चांगला होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते १० ते ११ वर्षे वयापर्यंत हँगिंग एक्सरसाइज केल्याने शारीरिक स्थिती सुधारते, याशिवाय उंची वाढवण्यास मदत होते. मात्र केवळ लटकल्यानेच उंची वाढेल असंही नाही. तर अनेक मुलं वाकून चालतात ज्यामुळे त्यांची उंची कमी दिसते, अशा मुलांनी लटकण्याचा व्यायाम केला तर त्यांच्या शरीर पॉश्चरमध्ये येते ज्यामुळे ते उंच दिसू लागतात.
हेही वाचा-…तर डायबिटीजमुळे येऊ शकते अंधत्व; ‘या’ ५ गोष्टींकडे दुर्लक्ष करणे पडू शकते महागात
उंची वाढण्यास कोणते घटक कारणीभूत आहेत?
कोणत्याही व्यक्तीची उंची त्याच्या पालकांकडून मिळालेल्या अनुवांशिक गुणांवर सर्वाधिक अवलंबून असते. कुटुंबातील प्रत्येकजण उंच असेल तर मुलंही उंच होतात. मात्र, पालकांपैकी एकाची उंची कमी असेल तर तुमची उंची कमी असू शकते. याशिवाय संतुलित आहार, हार्मोनल बदल, योग्य पोषणद्रव्ये मिळणे यामुळेही उंचीत फरक पडतो. तर अनेकदा काही आजारामुळेही उंची न वाढण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे उंची वाढण्यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम गरजेचा आहे. त्यामुळे लटकण्याचा व्यायाम केल्याचा शरीराला फायदाच होतो यात शंका नाही.