पाणी गरम करण्यासाठी वापरण्यात येणारा हिटर कॉइल एका काळानंतर त्याची चमक गमावते. सतत वापर होत असल्याने असे होऊ शकते. कालांतराने हिटरवर पांढरा थर चढू लागतो आणि पाणी गरम करताना बादलीच्या तळाशी तो थर जाऊन साठतो. जर तुमच्याबरोबरही असे होत असेल आणि तुम्हालाही या समस्येपासून सुटका हवी असेल तर आम्ही तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहोत ती वापरून पाहा. ही ट्रिक वापरून पाणी तापवण्याच्या हिटरचा रॉड नव्यासारखा चमकू लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मीठ आणि लिंबू
मीठ आणि लिंबू सफाई करण्यासाठी अत्यंत उपयूक्त आहे. त्यात थोडा चूना टाकून त्याची क्षमता तूम्ही आणखी वाढवू शकता. या मिश्रणाने रॉड साफ करण्यासाठी सर्वात आधी मीठ आणि चून्याची पेस्ट बनवून त्यावर लावा. साधारण ४ मिनिटासाठी ते तसेच राहू द्या. मग रॉडवर लिंबू घासून साफ करा.

हायड्रोजन पेरोक्साइड
तुम्ही हायड्रोजन पेरोक्साइडने वॉटर हीटर कॉइल अगदी सहज स्वच्छ करू शकता. यासाठी २ चमचे हायड्रोजन पेरॉक्साइड पाण्यात मिसळून कोमट करा. नंतर त्यात रॉड टाका आणि ५ मिनिटे तसेच सोडा. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही ते ब्रशने घासून स्वच्छ करू शकता.

या गोष्टीही छान आहेत
वॉटर हीटर रॉड चमकण्यासाठी बेकिंग सोडा आणि व्हिनेगर देखील वापरू शकता. यासाठी तुम्हाला एका बादलीत पाणी आणि व्हिनेगर मिक्स करून भिजवून ठेवावे लागेल. ४-५ तासांनंतर तुम्हाला रॉड चमकताना दिसेल. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही ते थोडेसे स्क्रब देखील करू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Winter cleaning tips simple trick to clean immersion water heater rod at home snk
Show comments