ऑक्टोबर हिट नुकतीच सरली असून, गुलाबी थंडी पडायला सुरुवात झाली आहे. कपाटात कपडयांच्या खणात थंडीसाठी खास उबदार कपडे दाखल होऊ लागले आहेत. वेस्टसाइड, पॅन्टालून्स, शॉपर्स स्टॉप अशा ठिकाणी इतर कपडयांसोबतच एका बाजूला ‘विंटर कलेक्शन’ही डोकवायला लागले आहेत. या वर्षीही नवे ट्रेण्ड बाजारात आले आहेत. मात्र सर्वाधिक बाजारपेठ व्यापून गेली आहे ती जॅकेट्स, हूड (झिपर), डेनिमच्या ट्रेंडनं.. फॅशन आणि उपयुक्तता असा दुहेरी उपयोग होत असल्याने हिवाळ्यात या ट्रेण्डला भरपूर मागणी आहे.
थंडी म्हटल्यावर लोकरीच्या कपड्यांना विसरून कसं चालेल? लोकरीचे स्वेटर्स, हातमोजे, शाल हे प्रकार थोडे आउटडेटेड झाले आहेत. पण सध्या फॅशनमध्ये इन असलेले जॅकेट आता लोकरीतही उपलब्ध आहेत. याची किंमत ८०० रुपयांपासून सुरू होते. थंडीच्या महिन्यांत सकाळी बाहेर पडायचं म्हटल की, बाहेरची बोचरी थंडी अंगाला टोचायला लागल्यावर कुडकुडण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. म्हणून साध्या टी-शर्टवर डार्क ब्लू रंगाचं जॅकेट घातल्याने ऊब तर मिळतेच शिवाय कपडय़ांना नवा लुकही येतो. या जॅकेट्सचा जुना कोटसारखा दिसणारा व्हिंटेज लुक बदलून त्यामध्ये आता अनेक प्रकार आले आहेत. केवळ लुकमध्येच नाहीतर कपडय़ाच्या प्रकारातही विविधता आढळेल.  ट्रेण्डी लुकमध्ये आणखी भर म्हणून ज्युट या कपड्याचे जॅकेट्स बाजारात आले आहेत. हे जॅकेट्स ७०० रुपयांपासून उपलब्ध आहेत.
कॉलेजला जाणा-या मुलामुलींसाठी हुडचा (झिपर) पर्याय अधिक योग्य आणि फॅशनेबल आहे. हूड हा असा प्रकार आहे की केवळ तरुणच नाही तर तरुणीही त्याचा सहज वापर करू शकतात. कानटोपीला पर्याय आहे तो हूडचा.. हूड हे दिसण्यास कानटोपीप्रमाणेच असतात. पण त्याला मॉडर्न लुक दिलेला असतो. चागंल्या दर्जाच्या हूडच्या किंमती १२०० रुपयांपासून सुरु आहेत. साध्यातले साधे हूड हे ५०० रुपयातही बाजारात उपलब्ध आहेत. थंडीत पार्टीला जायचं असेल आणि तेही वन पिस घालून तर त्यासाठी डेनिमचा पर्याय योग्य ठरेल. जास्तीत जास्त पार्टीवेअर वन पिस सॅटिन आणि कॉटनमध्ये उपलब्ध असतात. मात्र हे कपडे थंडीत घालणं योग्य नाही. त्या कपडय़ांवर जॅकेट घालावं लागतं. मात्र तोच वन पिस जर डेनिमचा असेल तर डेनिम थंडीच्या वातावरणाला योग्य असल्यामुळे त्याचा वापर थंडीत करणं सोयीचं होईल. हे वन पिस बाजारात ९०० रुपयांपासून उपलब्ध आहेत. डेनिमच्या कपडय़ाचा वापर करून बनवलेले लाँग टॉप, टी-शर्ट, वेस्ट कोट, शर्ट, जॅकेट्स बाजारात मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध आहेत. जाड कापड असल्याने डेनिमचे विंटरवेअर थंडीतही वापरता येऊ शकतात. काही ठिकाणी विंटर स्पेशल डेनिम कलेक्शन लावून संपूर्ण शोरूम डेनिममय झाल्याचे पाहावयास मिळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा