लांब आणि काळे केसे मिळवणे प्रत्येकाचे स्वप्न असते. आपले सौंदर्याच भर टाकण्याचे काम करतात. पण जेव्हा केसांमध्ये कोंडा होतो तेव्हा मात्र केसांच्या सौंदर्याला दृष्ट लागते. विशेषत: जेव्हा हिवाळ्यामध्ये केस रुक्ष आणि कोरडे होतात. अशा स्थितीमध्ये लोक केस जास्तवेळ बांधून ठेवतात किंवा कित्येक महागडे प्रॉडक्ट वापरतात. त्यामुळे कितीही महागडे प्रॉडक्ट वापरून सुटका मिळत नाही. तुम्ही देखील कोंड्याच्या समस्येमुळे हैरान झाला असाल तर हे हा लेख तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

आहार तज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून कोंड्यापासून सुटका मिळवण्याचे ३ सोपे उपाय सांगितले आहे. या उपायांच्या मदतीने कोंड्याच्या समस्येतून सहज तुमची सुटका होईल. चला जाणून घ्या..

कडूलिंब

कडुनिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळतात, जे केसांमध्ये साचलेली घाण आणि संसर्ग टाळण्यास मदत करतात. हे कोरडे टाळू स्वच्छ करण्यात देखील मदत करू शकते आणि केसांचे पोषण आणि त्यांची वाढीसाठी देखील प्रभावी आहे. अशा परिस्थितीत तुम्ही कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून डोक्याला लावू शकता किंवा कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून या पाण्याने डोके धुवू शकता. असे केल्याने तुम्हाला कोंड्याच्या समस्येपासून लवकरच सुटका मिळेल.

हेही वाचा – तुमच्या शरीराच्या आकारानुसार योग्य जीन्स कशी निवडावी? जाणून घ्या टिप्स

आवळा पावडरमध्ये दही मिसळा

डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी आवळा आणि दही यांचे मिश्रण डोक्यावर लावू शकता. आवळा व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे, जो कोंडा दूर करण्यासाठी प्रभावी आहे. त्याचबरोबर दह्यामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड केसांसाठी फायदेशीर आहे. हे टाळू स्वच्छ करण्यास, मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास आणि केसांच्या कूपांच्या वाढीस मदत करते. यासाठी प्रथम एका मोठ्या भांड्यात २ ते ३ चमचे आवळा पावडर टाका. यानंतर त्यात २ चमचे दही घालून मिक्स करा. आता ही पेस्ट केसांना लावा आणि सुमारे १ तास राहू द्या. नंतर सामान्य पाण्याने केस धुवा. लवनीत बत्रा यांच्या मते, ही पद्धत केसांमधला कोंडा लवकर काढून टाकण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते.

Power of protein : वृद्धांनी आहारात अधिक प्रथिनांचे सेवन का केले पाहिजे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या….

खोबरेल तेलासह हळद
एकीकडे, खोबरेल तेल त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यास मदत करते आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध होते, ते टाळूवरील बुरशी किंवा हानिकारक बॅक्टेरिया साफ करण्याचे देखील कार्य करते, तर दुसरीकडे, हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील असतात. अशा परिस्थितीत, हे मिश्रण आपल्या डोक्यावरील कोंडा त्वरीत साफ करण्यास देखील मदत करू शकते. यासाठी एका भांड्यात तुमच्या केसांनुसार खोबरेल तेल घ्या, त्यानंतर तेलात एक चमचा हळद टाकून पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट डोक्यावर सुमारे १ तास राहू द्या. यानंतर आपले डोके स्वच्छ पाण्याने धुवा.

Story img Loader