Winter Lifestyle Hacks : सकाळी लवकर उठायला होत नाही, अशी तक्रार अनेक जण करताना दिसतात. यात विशेषत: हिवाळ्यात लवकर उठणं हे फारच कठीण काम असते, काही केल्या हिवाळ्यात लवकर जाग येत नाही, अशाने दिवसभराचे वेळापत्रक बिघडते, डब्बा लवकर बनवून होत नाही, अंघोळी आणि सर्व आवरेपर्यंत ऑफिसला उशीर होतो. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला थंडीच्या दिवसात सकाळी लवकर जाग येण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत, ज्या तुम्ही फॉलो करून पाहू शकता. (Morning Mantra)
थंडीच्या दिवसांत सकाळी लवकर जाग येण्यासाठी काय करावे?
१) पुढील दिवसाचे नियोजन करा
थंडीच्या दिवसात लवकर उठण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी पुढच्या दिवसाचे नियोजन करा, यामुळे तुम्हाला सकाळी लवकर उठण्याचा एक उत्साह येईल. यामध्ये तुम्ही व्यायाम, ध्यान किंवा अभ्यास यांचाही समावेश करू शकता. ही नोट तुमच्याकडे ठेवा, जेणेकरून तुम्ही उठल्यानंतर ते फॉलो करू शकाल.
२) रात्री लवकर झोपा
थंडीत सकाळी लवकर उठण्यासाठी रात्री लवकर झोपणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही रात्री झोपण्याची एक फिक्स वेळ ठरवा, यामुळे तुमचे आरोग्यही निरोगी राहील. जर तुम्ही रात्री लवकर झोपलात, तर तुम्ही लवकर उठू शकाल, ज्यामुळे तुमचे दिवसाचे नियोजनही बिघडणार नाही.
३) झोपण्यापूर्वी अलार्म सेट करा
तुम्हाला सकाळी लवकर जाग येत नसल्यास तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी अलार्म सेट करू शकता. तुमच्या मोबाईल किंवा घड्याळावर अलार्म वाजल्यानंतर तो बेडपासून काही अंतरावर ठेवा, म्हणजे तुम्हाला उठून ते बंद करावे लागेल. जेव्हा तुम्ही अलार्म बंद करण्यासाठी जागे व्हाल तेव्हा लगेच रुममधील लाईट्स चालू करा.
हेही वाचा – लैंगिक संबंधांमुळे खरंच चांगली झोप लागते का? यावर डॉक्टरांचे काय मत आहे? जाणून घेऊ…
४) झोपण्यापूर्वी स्वत:साठी वेळ काढा
झोपण्यापूर्वी स्वतःसाठी थोड वेळ काढा आणि काही मिनिटे ध्यान, प्राणायाम किंवा कोणत्याही प्रकारचे पुस्तक वाचू शकता, त्यामुळे चांगली झोप लागते. रात्री झोपण्याच्या एक तास आधी तुम्ही स्क्रीन अर्थात मोबाईल, टीव्ही पाहणे बंद करा.
५) संयम ठेवा
संयम असेल तर सर्व काही ठीक होते असे म्हणतात. अशा परिस्थितीत सकाळी लवकर उठण्याची सवय लागण्यासाठी थोडा संमय ठेवावा लागेल, कारण कोणत्याही गोष्टीची सवय एका दिवसात लागत नाही. जर तुम्ही रोज सकाळी लवकर उठलात, तर भविष्यात ती एक सवय होऊन जाईल आणि तुम्हाला सकाळी वेळेवर सहज जाग येईल.