वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमानवृद्धीमुळे ऋतुचक्राचा तोल बिघडला आहे. त्यामुळे पूर्वी ऐन दिवाळीत भल्या पहाटे अभ्यंगस्नानाला गारठवून टाकणारी थंडी आता नाताळातही जाणवेनाशी झाली आहे. डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान काही दिवस हवेत सुखद गारवा असतो इतकेच. मात्र त्याला थंडी म्हणता येत नाही. शहरी हवामानातील या बदलत्या वाऱ्यांची दखल उबदार कपडय़ांच्या बाजारपेठेने घेतली आहे. आता तुलनेने कमी ऊब देणारे परंतु फॅशनेबल कपडे बाजारात उपलब्ध आहेत. नैसर्गिक गारठय़ापेक्षा कॉर्पोरेट विश्वातील वातानुकूलित कक्षात वावरताना अशा कपडय़ांचा खूप उपयोग होतो..

हल्ली मुंबईकरांच्या नशिबी दोनच ऋतू आहेत. एक जनजीवन विस्कळीत करणारा पावसाळा व गरमीने जिवाची घालमेल होणारा उन्हाळा. या दोघांच्या मध्ये महिना-दीड महिन्यापुरता हिवाळा अवतरतो. थंडी अगदी औटघटकेची असली तरी ठाणे, मुंबईकर तिचे उत्साहाने स्वागत करतात. या थंड वातावरणात उबदार कपडय़ांची खरेदी केली जाते. पूर्वी थंडीपासून बचाव करण्यासाठी ‘स्वेटर’ हा एकमेव उपाय होता. आता त्यात अनेक फॅशनेबल पर्याय उपलब्ध आहेत.

Uran, air pollution Uran,temperature, humidity Uran,
हवा प्रदूषणाचा मुद्दा निवडणुकीतून गायब? उरणमधील वाढते हवा प्रदूषण, तापमान आणि आर्द्रतेचा नागरिकांच्या शरीरावर परिणाम
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
ukraine israel war increase carbon emissions
युक्रेन, इस्रायल युद्धांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ
Mumbai constituencies polluted, byculla, Shivdi,
मुंबईत चार मतदारसंघ प्रदूषित; भायखळा, शिवडी, देवनार, मानखुर्दच्या समस्येकडे सर्वपक्षिय दुर्लक्ष
maharashtra Government climate action cell plan to face climate change zws
राज्यातील हवामान कृती कक्ष कसा करणार हवामान बदलांचा सामना?
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
Nagpur pollution latest news
दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी, मात्र दिवाळी आटोपताच उपराजधानीत…..

कडाक्याच्या थंडीत सकाळी उशिरापर्यंत झोपणे आवडत असले तरी शाळा-महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी तसेच नोकरदारांना भल्या पहाटे घर सोडावेच लागते. अशा वेळी उबदार कपडे उपयोगी ठरतात. अनेकजण याच काळात बाजारात, रस्त्यावर दुकान मांडून बसलेल्या तिबेटीयन अथवा नेपाळी विक्रेत्यांकडून स्वेटर्स विकत घेतात. त्याचप्रमाणे शोरूम्समधील ब्रॅण्डेड उबदार कपडेही खरेदी केले जातात. आपापल्या कुवतीनुसार, ऐपतीनुसार त्यापैकी योग्य दुकानावर आपली नजर स्थिरावते आणि आवडीनुसार जॅकेट्स विकत घेतले जाते. वॉर्म जॅकेट्स, टी-शर्ट, शॉल आदींचे अनेक प्रकार आपल्याला स्ट्रीट मार्केटमध्ये पाहायला मिळतात. सध्या बाजारात अनेक प्रकारचे कोट्स आणि जॅकेट्स उपलब्ध आहेत. या दोन्ही प्रकारांत अनेक पर्याय उपलब्ध असल्याने निवड करताना संभ्रमात पडायला होते. कोणत्या ग्राहकाला कोणते जॅकेट प्राधान्याने दाखवावे, हा प्रश्न विक्रेत्यासमोर नेहमीच उभा राहतो. जॅकेट निवडीच्या वेळी होणारा संभ्रम टाळायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते.

मुंबईतील हिंदमाता भागात नेपाळी, तिबेटीयन स्वेटर्स विक्रेते रस्त्यावर रंगीबेरंगी स्वेटर्सचा ढीग मांडून बसतात. त्यांना पाहिले की ऋतू बदलाची जाणीव होते. मेघालय, पंजाब, नेपाळ येथील माल ते विक्रीसाठी मुंबईत आणतात. साधारण ५०० ते हजार रुपयांपर्यंतचे विविध प्रकारांतील स्वेटर्स त्यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्यात लोकरीच्या स्वेटरपासून जर्कीग, जॅकेट, कानटोपी, लहान मुलांचे स्वेटर्स असे ऊबदार कपडे विक्रीसाठी असतात.

पी कोट
पी कोट या जॅकेट प्रकाराला ‘पी जॅकेट’ किंवा ‘पायलट जॅकेट’ या नावानेही ओळखले जाते. पी कोट साधारण नेव्ही ब्ल्यू रंगामध्ये पाहायला मिळतात. सुरुवातीला युरोपातील खलाशी आणि कालांतराने अमेरिकन खलाशी पी जॅकेटचा वापर करीत होते. पी कोट घातल्यानंतर माणूस राजेशाही थाट केल्यासारखाच भासतो. पी कोटला लांब बाह्य़ा असतात, तर त्याची कॉलर रुंद असते. पी कोटचा आकार त्याच्या डिझाइननुसार बदलतो. पुरुष आणि महिला या दोघांसाठी पी कोट उपलब्ध आहेत.

वुलन टी-शर्टस्
हल्ली सर्व कंपन्यांच्या कार्यालयांत मध्यवर्ती वातानुकूलन यंत्रणा असल्याने तिथे नेहमीच काश्मीरसारखे वातावरण असते. त्यामुळे तो गारठा सहन न होणारे वुलन टी-शर्टस्ना अधिक पसंती देतात. यामध्ये अनेक रंग बाजारात उपलब्ध आहेत. तसेच बहुरंगी टी-शर्टही यामध्ये पाहायला मिळतात. अशा प्रकारचे टी-शर्ट एक प्रकारचे स्वेटरच असतात. मात्र यामध्ये स्वेटर्सच्या तुलनेत कमी ऊब मिळते.

पार्का कोट
थंडीत सगळ्यात जास्त उबदारपणा देणारे जॅकेट म्हणजे ‘पार्का कोट्स’. पार्का कोट्स लांबीला मांडीपर्यंत येतात. त्याचप्रमाणे पार्का कोटला लांब बाह्या असतात. त्यामुळेच आपल्या शरीराचा बहुतेक भाग या जॅकेटमुळे झाकला जातो. पार्का कोट्सला पुढच्या बाजूला झिप असते आणि मागच्या बाजूला हूड असते. ‘हूड’ (डोक्यासाठी टोपी) असणाऱ्या जॅकेट्सला तरुणाईची विशेष पसंती मिळताना दिसते.

लेदर जॅकेट्स
गेल्या काही वर्षांपासून लेदर जॅकेट्सचे वेड तरुण मुलांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळते. बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये कलावंतही जॅकेट्स वापरताना दिसतात. साहजिकच याचे अनुकरण तरुण मंडळी करतात. भरपूर खिसे, स्ट्रेट किंवा फिटेड कट, विविध प्रकारच्या कॉलर्स अशा विविध वैशिष्टय़ांमुळे हे जॅकेट्स नेहमीच चर्चेचा विषय बनतात.

श्रग
सध्या मुलींमध्ये फॅशनेबल म्हणून ओळखला जाणारा जॅकेट्सचा प्रकार म्हणजे बोलेरो. बोलेरो जॅकेट्सना ‘श्रग’ म्हणूनही संबोधले जाते. श्रगचा वापर फॅशनेबल जॅकेट म्हणून केला जातो. कोणत्याही प्रकारच्या कपडय़ांवर श्रग साजेसे वाटत असल्याने त्याचा सर्रास वापर होतो. विविध प्रकारच्या स्लिव्हस्मध्ये श्रग उपलब्ध असून पुढील बाजूस श्रग मोकळे असतात.

कुठे मिळतील?
* हिंदमाता मार्केट, क्रॉफड मार्केट, दादर मार्केट आदी ठिकाणचे रस्ते अशा प्रकारच्या कपडयांच्या बाजाराने गजबजलेला पहायला मिळतात.
* किंमत- रुपये ५०० ते १०००.