हिवाळा सुरु होताच बहुतांश लोक लोकरीची शाल, स्वेटर वापरणे सुरु करतात. थंड वातावरणात लोकरीच्या कपड्यांमुळे त्वचेचे संरक्षण होते शिवाय शरीर उबदार ठेवण्यात मदत होते. पण थंडीच्या दिवसात अनेकांना लोकरीच्या कपड्यांमुळे त्वचेची अॅलर्जी होऊ लागते. त्यामुळे त्वचेवर लालसरपणा, सूज, नाक बंद होणे, त्वचा निघणे, खास सुटणे, पुरळ उठणे यांसारख्या समस्या जाणवू लागतात. हा त्रास काहीवेळ हाता- पायांवरही जास्त दिसून येतो. अनेकदा कोरड्या त्वचेमुळे ही समस्या जाणवते असे सांगितले जाते, पण आज आपण लोकरीच्या कपड्यांमुळे त्वचेची अॅलर्जी झालीच तर काय उपाय करु शकतो जाणून घेणार आहेत.
लोकरीच्या कपड्यांमुले अॅलर्जी
हिवाळ्यात लोकरीच्या कपड्याच्या थेट संपर्कात आल्याने अॅलर्जी होऊ शकते. यामुळे अर्टिकेरियाची समस्या उद्भवण्याचा धोका वाढतो. या समस्येत त्वचा लाल होणे, जळजळ, खास सुटणे या समस्याही जाणवू शकतात. त्यामुळे काहींन नाक आणि डोळ्यातून पाणी येण्याचा त्रास होतो.
कोल्ड क्रीम वापरा
लोकरीच्या कपड्यांमध्ये बरेच प्रकार आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही मऊ कपडे खरेदी करा. याशिवाय लोकरीचे कपडे घालण्यापूर्वी त्वचेवर कोल्ड क्रीम वापरा. तसेच लोकरीची अॅलर्जी टाळण्यासाठी मॉइश्चरायझरचा नियमित वापर करा. हिवाळ्यात आंघोळीनंतर संपूर्ण अंगाला व्यवस्थित मॉइश्चरायझर लावल्याने खूप आराम मिळू शकतो.
ऑलिव्ह ऑइलने मसाज करा
ऑलिव्ह ऑइलने रोज त्वचेचा मसाज केल्यास तु्म्हाला खूप फायदे मिळू शकता. अशाने तुम्ही रोज जरी लोकरीचे कपडे घातलेत तरी त्रास होणार नाही. याशिवाय व्हिटॅमिन ई असलेली नाईट क्रीमने चेहरा आणि शरीर मॉइश्चरायझ करा. ओल्या अंगावर मॉइश्चरायझर वापरणे उत्तम मानले जाते. कोरड्या त्वचेसाठी तुम्ही ग्लिसरीन आणि गुलाबपाणी मिक्स करुन ते मॉइश्चरायझर म्हणून लावू शकता.