Lose Weight Without Starving: अनेक जण वजन कमी करण्याच्या नादात उपाशी राहतात पण वजन कमी करणे याचा अर्थ उपाशी राहणे, असा नाही. दीर्घकाळ‍साठी वजन कमी करायचे असेल तर निरोगी जीवनशैली स्वीकारणे आणि चांगला आहार घेणे गरजेचे आहे. पौष्टिक आहार वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यासाठी उपाशी राहण्याची गरज नाही. आज आपण पोषक आहार घेऊन वजन कसे कमी करायचे याविषयी जाणून घेणार आहोत.

१. कमी नाही तर जास्त खा.

पौष्टिक पदार्थ कमी नाही तर जास्त खा. सॅलड, भाज्या, फळे, धान्य आणि शेंगा यांसारखे फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा. या पदार्थांचे सेवन केल्याने पोट भरून राहते ज्यामुळे जेवणा दरम्यान स्नॅक खायची गरज भासत नाही.

२. प्रोटिनयुक्त जेवण

स्नायूंच्या चांगल्या आरोग्यासाठी चयापचय शक्ती वाढवण्यास प्रोटिन्स महत्त्वाची भूमिका बजावतात. तुमच्या आहारात प्रोटिन्सचा समावेश करण्यासाठी अंडी, मसूर, मांस आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करा

३. भरपूर पाणी प्या

भरपूर पाणी प्या यामुळे भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यास मदत होते.

४. हालचाल करा

चालणे, डान्स करणे किंवा स्ट्रेचिंग करणे यासारख्या शारीरिक हालचालींमुळे चयापचय वाढू शकते यामुळे जिममध्ये जाण्याची गरज भासत नाही. या शारीरिक हालचालींमुळे कॅलरीज बर्न होतात.

५. साखरेचे सेवन कमी करा

साखरयुक्त पेये, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ आणि रिफाइन्ड कार्बोहायड्रेट्स वजन वाढण्यास आणि ऊर्जा कमी करण्यास करण्यास कारणीभूत ठरतात. मध किंवा गूळ यासारखे नैसर्गिक गोड पदार्थांचे सेवन करा पण मर्यादित करा.

६. ताण कमी करा आणि चांगली झोप घ्या

झोपेची कमतरता आणि अतिरीक्त ताणामुळे हार्मोन्स असंतुलित होतात ज्यामुळे लठ्ठपणा येतो. त्यासाठी ७-८ तास झोप घ्या. ध्यान करा आणि प्राणायामचा नियमित सराव करा.

७. उपाशी राहण्यापेक्षा योग्य पद्धतीने जेवण करा.

तुमच्या शरीराच्या गरजेनुसार, भूक लागल्यावर खा. पोट भरल्यावर खाऊ नका आणि भावनेच्या भरात अति जेवण करू नका. उदा. एखादा पदार्थ आवडतो म्हणून गरजेपेक्षा जास्त खाऊ नका.

वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैली महत्त्वाची आहे. त्यासाठी कोणतेही कठोर निर्बंध नाहीत. योग्य सवयींसह ऊर्जा टिकवून ठेवल्याने वजन कमी करण्यास मदत होते.