Room Cool Without Air Conditioning: उन्हाळ्यामुळे तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. खेडेगावाच्या तुलनेत शहरांमध्ये जास्त उष्णता जाणवते. उष्णतेपासून आराम मिळविण्यासाठी अनेक जण पंखा, एसी व कूलरचा वापर करतात. पण, बहुतांशी घरांत एसी, कूलरची सुविधा नसते. पण, अशा वेळी तुम्हाला उन्हापासून आराम मिळविण्यासाठी थंडावा हवाच असतो. मग तुम्ही काही सोप्या मार्गांनी तुमच्या घरात शीतलता निर्माण करू शकता.

एसी वा कूलरशिवाय घरात थंडावा कसा निर्माण करावा?

घर थंडावा निर्माण करण्यासाठी सकाळी आणि रात्री तुमच्या खोलीच्या खिडक्या उघड्या ठेवा. त्यामुळे घरात ताजी आणि थंड हवेचा प्रवेश होईल. दिवसा सूर्यप्रकाशामुळे खोली गरम होऊ नये म्हणून रिफ्लेक्टिव पडदे आणि खिडकीच्या पडद्यांचा वापर करा. त्यामुळे खोली गरम होणार नाही.

खोलीत मातीच्या भांड्यात पाणी ठेवा

खोलीत मातीच्या भांड्यात पाणी ठेवावे. त्यामुळे खोलीतील वातावरण शीत राहील. तुम्ही हिरवीगार रोपेदेखील लावू शकता. खोलीत कोरफड, मनी प्लांट इत्यादी ठेवल्याने हवा थंड राहते.

खोली स्वच्छ ठेवा

उन्हाळ्याच्या काळात खोली स्वच्छता राखणे खूप गरजेचे आहे. जर तुम्हीही खोलीत जास्त सामान ठेवत असाल, तर अनावश्यक सामान लगेच खोलीतून काढून टाका. त्यामुळे खोलीत हवा खेळती राहील.

खोलीतील फरशी पुसा

सकाळी आणि रात्री अशी दिवसातून दोन वेळा खोलीतील फरशी पुसून घ्या, ज्यामुळे खोलीत गारवा राहील. रात्री झोपण्यापूर्वी फरशी पुसल्याने रात्री खोलीतील थंडावा टिकून राहील.