पूर्वीच्या काळी महिला काही न करता ६० वर्षानंतरही तंदुरुस्त असायच्या. परंतु आता बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामना करावा लागतोय. ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो, अशा परिस्थितीत महिला दिनापूर्वी आपण महिलांशी संबंधित अनेक गोष्टी सांगणार आहोत ज्या त्याचा सामना त्या रोजच्या जीवनात करत असतात. महिलांचे शरीर वाढत्या वयाबरोबर कमजोर होऊ लागते, त्यामुळे महिला अनेक आजारांना बळी पडतात. यात असे अनेक आजार आहेत ज्यांचा महिला रोज सामना करत असतात पण त्याबद्दल कोणाला काही सांगत नाही, परंतु असं करणं अनेकदा त्यांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे असे कोणते ५ गंभीर आजार आहे ज्याचा अनेक महिला सामना करतात ते जाणून घेऊ…
एंडोमेट्रिओसिस
महिलांमध्ये आढळणारा हा आणखी एक आजार आहे, ज्याचा सामना अनेक सामान्य स्त्रिया करतात परंतु त्याबद्दल इतरांना सांगण्यात संकोच करतात. या आजारात गर्भाशयाच्या रेषा आत वाढण्याऐवजी बाहेरच्या दिशेने जाऊ लागता आणि फॅलोपियन ट्यूब आणि अंडाशयात विकसित होतात. ज्यामुळे स्त्रियांना असह्य वेदना होतात.
यूट्राइन फायब्रॉइड्स
यूट्राइन फायब्रॉइड्स हा देखील एक सामान्य आजार आहे, ज्याचा सामना बहुतेक स्त्रिया करतात, परंतु सुरुवातीला त्याबद्दल सांगण्यास टाळाटाळ करतात. या आजारात गर्भाशयात ट्यूमर वाढू लागतो आणि काहीवेळा तो कर्करोगाचे रूपही घेतो. हार्मोन्सचे संतुलन न राहणे, मासिक पाळीची अनियमितता यासारख्या समस्या ही या आजाराची सामान्य लक्षणे आहेत.
मॅनोरेजिया
मॅनोरेजिया हा महिलांध्ये आढळणारा असा आजार आहे जो मासिक पाळी दरम्यान ७ किंवा अधिक दिवस रक्तस्त्राव झाल्यामुळे होतो. या आजारात शरीरातून खूप रक्त बाहेर पडते आणि यालाच मॅनोरेजिया म्हणतात. त्यामुळे अॅनिमियासारख्या गंभीर समस्याही उद्भवू शकतात.
डिप्रेशन
नैराश्य हा एक सामान्य आजार आहे ज्याचा महिलाच नाहीतर पुरुष देखील सामना करतात. यात महिलांना घरातील समस्या, कामाचा ताण आणि मानसिक परिस्थितीचा सामना करावा लागतो, परंतु त्याबद्दल बोलण्यास संकोच वाटतो. यामुळे अनेकदा त्या एकटं राहणं पसंत करतात.
ब्रेस्ट कॅन्सर
ब्रेस्ट कॅन्सर हा आजार देखील महिलांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढतोय, मात्र अनेकदा त्याच्या लक्षणांकडे महिला दुर्लक्ष करतात आणि इतरांना त्याचा वेदनांबद्दल सांगत नाहीत. या आजारात स्तनामध्ये असह्य वेदना होतात. स्तनातून द्रव पदार्थ बाहेर पडू लागतो. या लक्षणांकडे सुरुवातीला लक्ष दिले नाही तर हा कॅन्सर गंभीर रुप धारण करु शकतो.