स्टायलिश दिसण्यासाठी अनेक तरुणी आजकाल मेकअप करतात त्यासोबत चांगली ड्रेसिंग आणि हाय हिल्सचा वापर करतात. सध्या हाय हिल्स हा तरुणांचा फॅशन ट्रेंड बनला आहे. ड्रेस, जिन्स काही परिधान केलेले असो पण पायात वेगवेगळ्या टाइपच्या हाय हिल्स वेअर करतात. कॉलेज किंवा ऑफिसमध्ये जाणाऱ्या मुलींना हाय हिल्स घालायला आवडतात. काही मुलींना हाय हिल्स घालणे खूप आरामदायी वाटते म्हणून त्या तासंतास त्या पायात घालून राहतात.

पण वयाच्या २० किंवा ३० वर्षांपर्यंत हाय हिल्स सँडल घालणं अनेकदा हानीकारक ठरू शकते. वयाच्या चाळीशीपर्यंत परिधान करणं धोक्यापेक्षा कमी नाही. उंच टाचांमुळे हाडांचे गंभीर नुकसान होऊ शकते. तसेच शरीराच्या खालच्या भागातही समस्या निर्माण होऊ शकतात. ज्या मुली नियमित हाय हिल्स घालतात त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे केवळ पायच दुखत नाही तर मणक्याचे आणि नितंबांच्या हाडांवरही त्याचा गंभीर परिणाम होतो. यामुळे जाणून घेऊ कोणत्या वयानंतर हाय हिल्स परिधान करणे टाळावे.

Five detox tips for rejuvenate your body
Post Diwali Detox Tips : सणासुदीला भरपूर गोड, तेलकट पदार्थ खाल्ले का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी करून पाहा हे पाच उपाय
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला
Can even 1.5 grams of weight gain increase the risk
१.५ ग्रॅम वजन वाढल्यानेही वाढू शकतो मधुमेहाचा धोका? तज्ज्ञांचे मत काय…
Sweet or savoury breakfast
सकाळच्या नाश्त्यामध्ये गोड पदार्थ खावे का? त्याचा आरोग्यावर काय होतो परिणाम? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…
Common lifting mistakes and how to avoid them
Lifting Heavy Objects Tips : जड वस्तू उचलताना तुम्हीसुद्धा श्वास रोखून ठेवता का? मग थांबा! डॉक्टरांचा हा सल्ला वाचा
swargate police file case against three for gang rape of woman by threatening to kill children
मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर सामुहिक बलात्कार; स्वारगेट पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास

१) पायांच्या पोटऱ्यांमध्ये असह्य वेदना

हाय हिल्स परिधान केल्याने पायांच्या पोटऱ्यांमध्ये वेदना होऊ लागतात. याचे साइड इफेक्ट्सही पाहायला मिळतात. सतत हाय हिल्स घातल्यामुळे पायांच्या नसा ताठ होतात यामुळे असह्य वेदना होऊ लागतात.

२) घोट्यांच्या वेदना

हाय हिल्स फॅशनेबल आणि स्टाईलसह पायांच्या आकारानुसार बनवल्या जातात, परंतु प्रत्येकाच्या घोट्याचा आकार, कमान आणि पायांचा आकार एक सारखा नसतो. म्हणूनच हाय हिल्स प्रत्येकाच्या पायात तंतोतंत फिट बसत नाही. शरीराच्या वजनाचा बॅलन्स हाय हिल्स घातल्याने बिघडतो त्यामुळे घोट्यात वेदना होतात. जास्त वेळ हाय हिल्स घातल्याने पायाच्या बोटांपासून कमान आणि घोट्यापर्यंत खूप वेदना होतात.

३) कंबर आणि त्या आजूबाजूच्या भागात वेदना

स्टायलिश दिसणे योग्य आहे पण आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. तुमच्या कम्फर्ट झोनचीही काळजी घ्या. हाय हिल्स पायांना पूर्णपणे साथ देत नाहीत यामुळे पायावर शरीराचे पूर्ण वजन झेपत नसल्याने असह्य वेदना सुरू होतात. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अभ्यासानुसार, कंबर आणि नितंबांच्या आसपासचा भाग हाय हिल्समुळे अधिक प्रभावित होतो.

४) रक्तवाहिन्यांचे नुकसान होते

हाय हिल्सच्या टेक्सचरमुळे पायाचा पुढचा भाग छोट्या जागेत बसण्याचा प्रयत्न करतो आणि जास्त वेळ या स्थितीत राहिल्याने त्याचा वाईट परिणाम होतो. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अभ्यासानुसार, हाय हिल्समुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पाय जास्त काळ दबावाखाली राहिल्यास रक्तप्रवाहात अडथळा येण्याचा धोका असतो आणि त्यामुळे रक्तवाहिन्या तुटण्याचा किंवा फुटण्याचा धोकाही असतो.

५) लिगामेंटवर वाईट परिणाम

जास्त काळ हाय हिल्स घातल्याने लिगामेंटवर गंभीर आणि वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे लिगामेंट हळूहळू कमकुवत होऊ लागतो. अशा स्थितीत पायाला दुखापत झाल्यास लिगामेंट सहज तुटण्याचा धोका वाढतो.