कोणत्याही टाकाऊ वस्तूंपासून एक अद्भूत कलाकृती तयार करण्याचं कसब फार कमी जणांकडे असते. बघता बघता एक कवडीमोल किंमत असलेल्या आणि टाकाऊ वस्तूंचं रुपांतर  ते जगातल्या सुंदर कलाकृतीत करू शकतात. आणि याच कलागुणांचा वापर करून दोन मुलांच्या आईने तब्बल साडेसहा लाखांची रोख रक्कम जिंकली आहे. कॅरी नावाच्या महिलेने एका फॅशन स्पर्धेत भाग घेतला होता. टॉयलेट पेपरपासून वेडिंग गाऊन म्हणजे लग्नाचा ड्रेस तयार करण्याची ती स्पर्धा होती. यात कॅरीसारखे जवळपास दीड हजारांहून अधिक कलाकार सहभागी झाले होते. पण या सगळ्यांपेक्षा कॅरी वरचढ ठरली.

तिने तीन महिने मेहनेत घेऊन कागदापासून ड्रेस तयार केला. टॉयलेट पेपर थोडा मऊ असतो आणि लगेच फाटतोही तेव्हा यापासून कपडे तयार करताना अनेक अडचणी तिला येत होत्या. शिवाय मुलंही लहान असल्यानं मुलं  आणि घर सांभाळत तिनं सुंदर असा वेडिंग गाऊन तयार केला. या वेडिंग ड्रेसमध्ये सर्वात आकर्षणाचा विषय होता तो यावर असणारी नाजूक फुलपाखरं. कॅरीने अतिशय नाजूक अशी दीड हजार फुलपाखरं यावर लावली होती. विशेष म्हणजे ही फुलपाखरं तिने हाताने तयार केली होती.

 

Story img Loader