Drinking okra water for 6 months: ‘ आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत प्रत्येक जण निरोगी राहण्यासाठी काही ना काही उपाय करत असतो. अशातच अम्मू ब्युटी ब्रँडची संस्थापक ब्युटी इन्फ्लुएंसर झरीफा यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आणि लिहिले, “मी सहा महिन्यांपासून भेंडीचे पाणी पीत आहे आणि याने माझे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे.” अम्मू ब्युटी ब्रँडची संस्थापक ब्युटी इन्फ्लुएंसर झरीफा यांचा या दाव्याचा व्हिडीओ स्वत: यूके सर्जन डॉ. करण राजन यांनीही शेअर केला आहे. पुढे आतड्याच्या आरोग्यासाठी भेंडी कशी उपयुक्त ठरते, हेसुद्धा इन्फ्लुएंसर झरीफा यांनी सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झरीफा या व्हिडीओमध्ये दावा करत आहे की, “मी सहा महिन्यांपासून भेंडीचे पाणी पीत आहे आणि याने माझे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे.” झरीफाने पहिला बदल शेअर करताना सांगितले की, “माझं वजन नियंत्रणात राहण्यासाठी लक्षणीय प्रमाणात मदत झाली आहे. कारण भेंडी पाण्यात भिजवल्यावर ती विरघळणारे आणि अघुलनशील फायबर सोडते, जे सर्वसाधारणपणे पचनास मदत करते.” ती पुढे म्हणाली, “माझी त्वचा खूप उजळ, नितळ आणि चमकदार झाली. भेंडीच्या पाण्यात आढळणाऱ्या अँटी-ऑक्सिडंट्समुळे माझ्या त्वचेचा पोत कमालीचा सुधारला आहे, त्यामुळे मी आठवड्यातून किमान तीन-चार वेळा १.७ लिटर भेंडीचे पाणी पिते.

भेंडीच्या पाण्याचे संभाव्य आरोग्य फायदे

डॉ. करण राजन यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, भेंडीचे पाणी एक प्रीबायोटिक आहे, जे आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियांना आहार देते, ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते. हे आतड्यांच्या हालचालींचे नियमन करण्यास, प्रतिबंध करण्यास मदत करू शकते. ते म्हणाले, “तुम्हाला तुमच्या आतड्याचे आरोग्य सुधारायचे असेल तर भेंडीचे पाणी पिणे खरोखर मदत करू शकते. डॉ. राजन पुढे म्हणाले, “जेव्हा तुम्ही भेंडी पाण्यात मिसळता, तेव्हा ते तुमच्या आतड्यात एक जेलसारखा पदार्थ बनवते आणि हे जेल पाणी शोषून घेते, ज्यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही आणि जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

भेंडीचे पाणी वजन कमी करण्यास मदत करते

भेंडीचे पाणी वजन कमी करण्यासाठी जादूची गोळी नाही (तुम्हाला संतुलित आहार आणि चांगल्या परिणामांसाठी नियमित व्यायामासह ते एकत्र करावे लागेल). डॉ. राजन म्हणतात की, योग्य आहार, व्यायाम आणि भेंडीचे पाणी वजन कमी करण्यास मदत करू शकते. तसेच एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासदेखील मदत करते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman says drinking okra water for 6 months changed her life improved gut health doctor reveals if it actually works srk