पुरुष जास्त तंदुरुस्त असतात की महिला या प्रश्नाचे उत्तर ‘वॉटरलू विद्यापीठा’च्या संशोधकांनी शोधून काढले आहे. महिला पुरुषांपेक्षा जास्त ऑक्सिजन शरिरामध्ये घेऊ शकत असल्याने त्यांच्या स्यनायूंवर कमी ताण येतो. एरोबिक्स आणि एकंदरीत व्यायमाचा विचार करता स्नायूंवर कमी ताण पडणे जास्त फाद्याचे असते. महिला या पुरुषांपेक्षा जास्त ऑक्सिजन शरीरात घेऊन त्याचा वेगाने वापर करतात. स्त्रियांची व्यायामाची क्षमता पुरुषांपेक्षा ३० टक्क्यांनी जास्त असल्याचे या संशोधकांचे म्हणणे आहे.
श्वसनावाटे शरीरात ऑक्सिजन घेण्याची महिलाची क्षमता अधिक असते. शिवाय घेतलेला श्वसनाद्वारे शरीरात घेतलेला ऑक्सिजन वापरून नव्याने ऑक्सिजन घेण्याची क्रियाही महिलांच्या शरीरामध्ये पुरुषांच्या तुलनेने जलद होते. महिलांचे स्नायू रक्तामधील ऑक्सिजन पटकन शोषून घेतात. या कारणामुळे महिला व्यायाम करताना पुरुषांपेक्षा सरस ठरतात, असं ‘अॅपलाइड फिजिओलॉजी, न्युट्रिशन अॅण्ड मेटाबायोलिझम’ नियतकालिकातील अहवालात म्हटले आहे.
एका प्रयोगामध्ये अठरा तरुण-तरुणींना ट्रेडमीलवर व्यायाम करायला सांगण्यात आले. त्यांच्या शरीरातील प्रत्येक घटकांवर विशेष लक्ष देण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली होती. पुरुषांचे शरीर हे नैसर्गिकरित्या व्यायामासाठी जास्त योग्य असते हा पारंपारिक समज या अभ्यासामुळे मोडीत निघाल्याचे मत संशोधन करणाऱ्या थॉमल बेल्टरीमी यांनी व्यक्त केले आहे.
मात्र महिलांची ऑक्सिजन वापरण्याची क्षमता पुरुषांपेक्षा अधिक का असते याविषयी या संसोधनामध्ये काहीच नमूद करण्यात आलेले नाही. त्यामुळेच पुरुष हे महिलांपेक्षा जास्त तंदुरुस्त असतात हा पारंपारिक समज या संशोधनाने मोडीत काढला असला, तरी असे नक्की का होते, महिलांमध्ये श्वसनाद्वारे शरीरात ऑक्सिजन घेण्याची क्रिया जलद गतीने का होते, तसेच शरीरात घातलेल्या ऑक्सिजनचा वापर जलद गतीने होण्याविषयीचे उत्तर सापडल्यानंतर या विषयासंदर्भात आणखीन नवीन माहिती समोर येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.