फॅशन कट्टा
नुसता मेकअप आणि कपडे एवढय़ातच फॅशन संपत नाही. फॅशनेबल राहायचं तर ज्वेलरी, शूज, चप्पल, पर्स, घडय़ाळं या सगळ्यांचा ट्रेण्ड इन असलेला जामानिमा माहीत असायलाच हवा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अगदी पूर्वीपासून भारतात फॅशनप्रेमींची संख्या खूप मोठी आहे. त्या वेळी नट, नटय़ा किंवा रॅम्प मॉडेल सोडता फॅशन सर्वसामान्यांना उपलब्ध नव्हती. सामान्यांचा फॅशनकडे बघण्याचा दृष्टिकोन खूपच वेगळा होता. केवळ चित्रपटात दिसत असलेली किंवा रॅम्पवर दिसत असलेली फॅशन लोक फॉलो करत होते. परंतु सध्या हे चित्र बदलताना दिसत आहे. हल्ली सामान्यांना फॅशन उपलब्ध झाली आहे.
हल्ली फॅशन जगात खूप लक्षवेधी आणि सकारात्मक बदल झालेले पाहायला मिळतात. रंग, वर्ण, उंची, बांधा या सगळ्यापलीकडे जाऊन सगळ्यांना आपलंसं करणारी फॅशन आपल्या समोर आली. अनेक डिझायनर, मॉडेल यांनी पुढाकार घेऊन अशा प्रकारच्या खुल्या फॅशनचा ट्रेण्ड आणला आणि त्यातूनच जन्माला आली बंडखोर फॅशन. तिला कोणत्याही परिभाषेची किंवा चौकटीत राहण्याची गरज नाही.
२०१८ हे वर्षसुद्धा फॅशनविश्वात असेच नवनवीन बदल घडवून आणून एक बंडखोर स्टाइल आपल्या समोर आणेल असंच वाटतं. त्यात अनेक बंडखोर अॅक्सेसरीजसुद्धा असणार आहेत. बघूया कोणत्या अॅक्सेसरीजचे प्रकार सध्या ट्रेण्ड इन आहेत.
ओव्हरसाइज ज्वेलरी
२०१८ या वर्षांत बोल्ड इस ब्युटिफुल या तत्त्वाप्रमाणे फॅशन विश्वात बदल घडून येतील, ज्वेलरीच्या बाबतीतसुद्धा हे सूत्र नक्कीच पाळलं जाईल. ओव्हरसाइज इअिरग्ज, ओव्हरसाइज किंवा प्लस साइज नेकपीस, ओव्हरसाइज अंकलेट, ओव्हरसाइज ब्रेसलेट, या सगळ्यांच्या बरोबरीने ओव्हरसाइज नोजपिनसुद्धा सगळ्यांच्या पसंतीस उतरतील.
क्लासी ओव्हर कोट्स
लाँग लेन्थ ओव्हरकोट्स, ओव्हरसाइज कॉलर कोट्स, केपकोट्स असे वेगवेगळे प्रकारचे कोट्स नक्कीच ट्रेण्ड इन असणार आहेत. त्यावर असलेलं बारीक थ्रेड वर्क, अॅनिमल प्रिंट्स, नैसर्गिक पाना-फुलांचे प्रिंट्स असे वेगवेगळे प्रकार या कोट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ते यावर्षी ट्राय करून बघायला आणि ट्रेण्डी दिसायला तुम्हाला नक्की आवडेल.
कम्फी बॅग्स
२०१८ या वर्षांत कम्फर्टेबल किंवा इझी टू कॅरी बॅग्स मार्केटमध्ये उपलब्ध असतील. त्यात ओव्हरसाइज बॅग्सपासून ते अगदी ट्रेण्डी लहान क्लचेसपर्यंत सगळ्यांचा समावेश असेल. स्लिंग बॅग्स तरुणाईत आधीच फेमस आहेत. त्याचे वेगवेगळे प्रकार या वर्षांत नक्कीच पाहायला मिळतील. तसेच यंदा मरुन, ऑलिव्ह ग्रीन, पर्पल, मस्टर्ड यलो, राखाडी, ब्लॅक तसंच काहीसं युनिक आणि काहीसं निसर्गतत्त्वाशी साधम्र्य साधणारं आणि सगळ्यांना आवडेल असं बोल्ड कलर पॅलेट ट्रेण्ड इन असेल.
फूटवेयर
गेल्या दोन वर्षांत स्नीकर्स खूप ट्रेण्ड इन होते. या २०१८ मध्ये बॉक्स हिल्स असलेले फूटवेयर ट्रेण्ड इन असतील. बॉक्स हिल बूट्स, बॉक्स हिल सॅण्डल्स, बॉक्स हिल स्लिप ऑन्स या वर्षांत ट्रेण्ड इन असतील. बाटापासून ते अगदी झारापर्यंत बऱ्याच ब्रॅण्डेड फूटवेयरमधील नवीन नवीन कलेक्शनमध्ये बॉक्स हिल फूटवेयर मोठय़ा प्रमाणावर दिसून आले. बॉक्स हिल फूटवेयर फॅशन एलिमेंटला धक्का न देता सगळ्यांना कम्फर्टेबल असतील असे आहेत. पायाच्या टाचेला समान पातळीवर असलेल्या हिलमुळे खूप कम्फर्टेबल फिल मिळतो.
घड्याळं
घडय़ाळाची संकल्पना आता एक पट्टा आणि मध्ये डायल अशी आणि एवढी साधी राहिलेली नाही. त्यात कालानुरूप खूप बदल होत गेले आहेत. २०१८ मध्ये घडय़ाळाचे अगदी सटल ते फॅन्सी असे अनेक प्रकार पाहायला मिळणार आहेत. टायटन या घडय़ाळाच्या ब्रॅण्डने त्यांच्या नवीन कलेक्शनमध्ये खूप वेगवेगळे प्रयोग केले आहेत. डिझायनर मसाबा गुप्ता हिच्याकडून डिझायनर घडय़ाळांची एक सीरिज त्यांनी डिझाइन करून घेतली आहे. ‘मोमेंट फॉर आमची मुंबई’ ही सीरिज त्यांनी डिझाइन केली आहे. यातील घडय़ाळं २६/११ या दिवशी मुंबईकरांनी दाखवलेल्या स्पिरीटला सलाम करण्यासाठी बनविण्यात आली आहेत. प्री ऑर्डर तत्त्वावर ही घडय़ाळं विकली जाणार आहेत. फास्टट्रॅक या ब्रॅण्डनेसुद्धा आपलं नवीन कलेक्शन युथफुल पद्धतीने डिझाइन केलं आहे. या घडय़ाळांमध्ये अत्यंत बोल्ड कलर्स वापरले गेले आहेत. तसेच डायलमध्ये किंवा पट्टय़ावर काही ठिकाणी एखादं वाक्य, शब्द लिहिले गेले आहेत.
या सगळ्या अॅक्सेसरीज तुम्हाला मार्केटमध्ये दिसून येतील. तुम्ही फॅशनिस्टा असा किंवा नसा या अॅक्सेसरीज तुम्हाला नक्कीच आवडतील आणि वापरायला कम्फर्टेबल असतील. तुमच्या आवडीपणाने तुम्ही त्या नक्की ट्राय करून बघा.
प्राची परांजपे – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा