पुरूषांचा खालच्या पट्टीतील आवाज स्त्रियांना भूरळ घालत असल्याचे एका नव्या अभ्यासामधून समोर आले आहे.
खालच्या पट्टीतील आवाजाचे पुरूष स्त्रियांना आवडतात. अशा पुरूषांसोबत काहीकाळ नाते जोडण्यात स्त्रियांचा कल दिसतो. मात्र, खालच्या पट्टीतील आवाजाच्या पुरूषांसोबत लग्न करण्यात त्यांना रस नसल्याचे देखील हा अभ्यास सांगतो. कॅनडा स्थित मॅकमास्टर विद्यापीठाच्या संशोधकांनी हा शोध लावला आहे. 
या अभ्यासामुळे मानवी आवाजाच्या उत्क्रांतीमध्ये भर पडली असून, जोडीदार निवडीच्या आवडी निवडी समोर आल्या आहेत.
“एखाद्याच्या आवाजावरून त्या व्यक्तीबद्दल आपण काय विचार करतो हे ठरते,” असे मानसशास्त्र विभागातील चेताविज्ञानाचे अभ्यासक व या संशोधनावर काम करत असलेले जिलिअन ओकॉन्नर म्हणाले.
“खालच्या पट्टीतील आवाजाच्या पुरूषांकडून फसवणूक होण्याची शक्यता असली तरी स्त्रिया अशा पुरूषांकडे आकर्षीत होतात. या स्त्रियांना अशा पुरूषांच्या एकनिष्ठेबद्दल शंका असते. मात्र, या पुरूषांसोबत काही काळासाठी नाते निर्माण करण्यात स्त्रियांना कोणतीही चिंता वाटत नाही. असे ओकॉन्नर म्हणाले.
या अभ्यासा दरम्यान ८७ स्त्रियांचे निरीक्षण करण्यात आले. पुरूषांच्या आवाजांवरून या स्त्रिया कोणत्या पुरूषासोबत नाते जोडायचे हे ठरवत होत्या.
संशोधकांकडून या अभ्यासामध्ये भाग घेतलेल्या स्त्रियांना पुरूषांच्या कोणत्या प्रकारच्या आवाजावरून त्यांना त्यांच्याशी जास्तकाळासाठी राहायला आवडेल अशी विचारणा करण्यात आली.
व्यक्तिमत्व आणि वैयक्तिक वेगळेपण या नियतकालिकामध्ये हा अभ्यास प्रकाशीत करण्यात आला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा