काही आजार हे फार गंभीर रूप घेऊ शकतात. त्यामुळे शरिराला मोठी हानी होऊ शकते. अशा आजारांमुळे शरिराचे अंग देखील गमवण्याची वेळे येऊ शकते. किम स्मिथ नावाच्या महिलेसोबतही असाच प्रकार झाला आहे. २०१७ साली युकेमध्ये राहणाऱ्या किम स्मिथ नावाच्या महिलेला सेप्सिस झाले होते. सेप्सिसमुळे तिला शरीरातील चार अवयव गमवावे लागले. त्यानंतर डॉक्टरने या महिलेचे डबल हँड ट्रान्सप्लांट केले.
या संसर्गामुळे झाले सेप्सिस
काही वर्षांपूर्वी किम स्पेन येथे गेल्या होत्या. येथे त्यांना मुत्रमार्गात संसर्ग (urinary tract infection) झाल्यानंतर सेप्सिसची समस्या झाली होती. साऊथ वेस्ट न्यूज सर्व्हिसच्या अहवालानुसार, डॉक्टरांनी किंम यांना ९ महिन्यांपर्यंत तात्पुरते कोमात ठेवले. युटिआयनंतर किंमच्या शरीरात पसरलेल्या सेप्सिसमुळे पाय आणि हाथ त्यांना गमवावे लागले.
(COVID : ताप, थकवा नव्हे तर आता ‘हे’ आहे कोविडचे प्रमुख लक्षण, म्युटेशनमुळे घडले अनेक बदल)
या सर्व समस्या होण्यापूर्वी किम या हेअर ड्रेसर म्हणून काम करत होत्या. चारही अवयव निकामी झाल्यानंतर किमला डबल हँड ट्रान्सप्लांटसाठी खूप वाट पाहावी लागली. आजारामुळे माझे अंग जातील हे निश्चित होते, डॉक्टरांनी जेव्हा या विषयी मला विचारले तेव्हा मी त्यास संमती दिली. डबल ट्रान्सप्लांटने मला कुकिंगसह इतर काम करता येईल, अशी आशा किम यांनी साऊथ वेस्ट न्यूज सर्व्हिसला व्यक्त केली आहे.
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि प्रिव्हेन्शननुसार दरवर्षी जगभरातील १७ लाख लोकांना सेप्सिसची समस्या होते. शरीरात झालेल्या संसर्गामुळे सेप्सिस होते. हळू हळू ते शरिरात वाढल्यानंतर अवयव निकामी होण्याचा प्रकार सुरू होते, परिणामी व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. फुफ्फुस, मूत्रमार्ग, त्वचा आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये संसर्ग झाल्यास सेप्सिसचा धोका वाढतो.
(अधिक तहान लागणे ‘या’ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण, वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला)
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीननुसार, एक तृतियांश सेप्सिसची प्रकरणे ही मुत्रमार्गात संसर्ग झाल्याने उद्भवतात. मुत्रमार्गात संसर्गाची समस्या घट्ट कपडे घालणे, बाथरूमच्या वाईट सवयी, सेक्स नंतरच्या सवयी आणि डिहायड्रेशनमुळे होते.